दुसर्‍या टप्प्यातील प्रचार संपला; उद्या मतदान

बुधवार, 16 एप्रिल 2014 (10:44 IST)
मुंबई- राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या दुसर्‍या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा मंगळवारी संध्याकाळी थंडावल्या. येत्या उद्या (गुरुवारी) राज्यातील 19 मतदारसंघातील सुमारे सव्वातीन कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावून 358 उमेदवारांचे भवितव्य मतदानयंत्रामध्ये बंद करतील.

राज्यातील दुसर्‍या टप्प्यात होणार्‍या मतदानात सुशीलकुमार शिंदे, गोपीनाथ मुंडे, सुप्रिया सुळे, अशोक चव्हाण, राजू शेट्टी, विजयसिंह मोहिते-पाटील, पद्मसिंह पाटील, शिवाजीराव आढळराव-पाटील, दिलीप गांधी, भाऊसाहेब वाकचौरे, निलेश राणे यांच्यासह अन्य उमेदवार रिंगणारत उतरले आहेत. भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी, कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार या राष्ट्रीय नेत्यांच्या सभाही यापैकी काही मतदारसंघामध्ये झाल्या. या सभांचा आणि प्रचाराचा फायदा कोणाला झाला, हे आता मतमोजणीनंतरच स्पष्ट होईल. 
राज्यात दुसऱया टप्प्यात मतदान होणारे मतदारसंघ आणि महत्त्वाचे उमेदवार पुढीलप्रमाणे
हिंगोली - राजीव सातव (कॉंग्रेस) - सुभाष वानखेडे (शिवसेना)
नांदेड - अशोक चव्हाण (कॉंग्रेस) - डी. बी. पाटील (भाजप)
परभणी - विजय भांबळे (राष्ट्रवादी कॉंग्रेस) - संजय जाधव (शिवसेना)
मावळ - राहुल नार्वेकर (राष्ट्रवादी कॉंग्रेस) - श्रीरंग बारणे (शिवसेना)
पुणे - विश्वजीत कदम (कॉंग्रेस) - अनिल शिरोळे (भाजप) - दीपक पायगुडे (मनसे)
शिरूर - देवदत्त निकम (राष्ट्रवादी कॉंग्रेस) - शिवाजीराव आढळराव पाटील (शिवसेना)
बारामती - सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी कॉंग्रेस) - महादेव जानकर (रासप)
अहमदनगर - राजवी राजळे (राष्ट्रवादी कॉंग्रेस) - दिलीप गांधी (भाजप)
शिर्डी - भाऊसाहेब वाकचौरे (कॉंग्रेस) - सदाशिव लोखंडे (शिवसेना)
बीड - सुरेश धस (राष्ट्रवादी कॉंग्रेस) - गोपीनाथ मुंडे (भाजप)
उस्मानाबाद - पद्मसिंह पाटील (राष्ट्रवादी कॉंग्रेस) - रवि गायकवाड (शिवसेना)
लातूर - दत्तात्रय बनसोडे (कॉंग्रेस) - सुनील गायकवाड (भाजप)
सोलापूर - सुशीलकुमार शिंदे (कॉंग्रेस) - शरद बनसोडे (भाजप)
माढा - विजयसिंह मोहिते पाटील (राष्ट्रवादी कॉंग्रेस) - सदाभाऊ खोत (स्वाभिमानी शेतकरी संघटना) - प्रतापसिंह मोहिते पाटील (अपक्ष)
सांगली - प्रतिक पाटील (कॉंग्रेस) - संजयकाका पाटील (भाजप)
सातारा - उदयनराजे भोसले (राष्ट्रवादी कॉंग्रेस) - अशोक गायकवाड (आरपीआय)
रत्नागिरी-सिंधुदुर्ग - निलेश राणे (कॉंग्रेस) - विनायक राऊत (शिवसेना)
कोल्हापूर - धनंजय महाडीक (राष्ट्रवादी कॉंग्रेस) - संजय मंडलिक (शिवसेना)
हातकणंगले - कल्लाप्पा आवाडे (कॉंग्रेस) - राजू शेट्टी (स्वाभिमानी शेतकरी संघटना)

वेबदुनिया वर वाचा