केजरीवाल आणि कुमार विश्वासांविरुद्ध गुन्हा

मंगळवार, 22 एप्रिल 2014 (12:36 IST)
आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्यामुळे आम आदमी पक्षाचे (आप) राष्‍ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल आणि पक्षाचे नेते कुमार विश्वास यांच्यासह दहा जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गौरीगंज पोलिस ठाण्यामध्ये या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

अमेठीत कुमार विश्वास यांनी कॉंग्रेसचे राहुल गांधी यांना आव्हान दिले आहे. कुमार विश्वास यांनी केलेल्या प्रचाराचा व्हिडिओ बघितल्यानंतर त्यांच्याविरोधात हा गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे निवडणूक अधिकारी नविनकुमार सिंग यांनी सांगितले. केजरीवाल आणि कुमार विश्वास यांनी प्रतिबंधात्मक आदेशांचे उल्लंघन करून पूर्वपरवानगी न घेता रस्त्यावर सभा घेतली, असा ठपका ठेवण्यात आला आहे.

प्रियांका गांधी, राहुल गांधी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी कुमार विश्वास यांच्यासह 100 जणांवर गेल्या शुक्रवारी(18एप्रिल) गौरीगंज पोलिस ठाण्यात धरणे आंदोलन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

वेबदुनिया वर वाचा