एप्रिलच्या मध्यापासून लोकसभा निवडणुका; आयोगाची तयारी सुरु

सोमवार, 3 मार्च 2014 (19:00 IST)
नवी दिल्ली- लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने तयारी सुरु केली असून एप्रिल महिन्याच्या मध्यापासून 
 
निवडणूक होण्याची शक्यता आहे. सहा ते सात टप्प्यात या निवडणुका होणार आहेत. पहिल्या टप्प्यातील मतदान 10 एप्रिलला होण्याचे 
 
अनुमानही निवडणूक आयोगातील वरिष्ठ अधिकार्‍यांनी व्यक्त  केले आहेत. आयोग लवकरच निवडणुकीच्या घोषणेसोबत राजकीय 
 
पक्षांसाठी आदर्श आचारसंहिता लागू करणार आहे.
 
15 व्या लोकसभेचा कार्यकाळ एक जून रोजी संपत आहे. त्यामुळे नव्या लोकसभेची स्थापना 31 मे रोजी करावी लागणार आहे. 
 
आयोगाने मतदान वेळापत्रक तयार केले असून त्याला अंतिम रुप देण्याची काम सुरु आहे. 
 
दरम्यान, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत उमेदवार खर्चाची मर्यादा 40 लाखावरून 70 लाख रुपये करण्‍यात आली आहे. ‍याशिवाय 
 
मतदान यंत्रांवरील उमेदवारांच्या यादीत आता ‘वरीलपैकी कुणीही नाही’ या बटणाचा पर्यायही मतदारांसाठी उपलब्ध करून दिले जाणार 
 
आहे. 

वेबदुनिया वर वाचा