'एक्झिट पोल' म्हणजे टाईमपास- ओमर
लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वी जाहीर झालेली विविध एक्झिट पोलची भविष्यवाणी केवळ 'टाईमपास' असल्याचे जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी म्हटले आहे.
ओमर अब्दुल्ला यांनी ट्विटरवर आपले मत मांडले. 16 मे रोजी येणार्या निकालावरच आपला विश्वास आहे. बाकी सगळे टाईमपास असल्याचे म्हटले आहे.
विविध संस्था आणि वाहिन्यांनी केलेल्या सर्व्हेत लोकसभेचा कौल एनडीएच्या बाजुने दिला आहे. याच एक्झिट पोलवर ओमर अब्दुल्ला यांनी आपली प्रतिक्रिया नोंदविली आहे. प्रत्येक निष्कर्षांमध्ये तफावत आढळत आहे.