Jyeshtha Gauri 2024 : ज्येष्ठा गौरी पूजन शुभ मुहूर्त आणि महाप्रसाद

Jyeshtha Gauri 2024 महाराष्ट्र तसेच इतर राज्यांमध्ये गणेश चतुर्थी उत्सवादरम्यान अनेक घरांमध्ये ज्येष्ठा गौरी पूजन केले जाते. 2024 मध्ये 10 सप्टेंबर रोजी गौरी आवाहन तर 11 सप्टेंबर रोजी गौरी पूजन आणि 12 सप्टेंबर 2024 रोजी गौरी विसर्जन आहे.
 
ज्येष्ठा गौरी पूजन आणि महाप्रसाद 11 सप्टेंबर 2024 बुधवार रोजी
ज्येष्ठा गौरी विसर्जन 12 सप्टेंबर गुरुवार 2024 रोजी
 
ज्येष्ठा गौरी पूजन आणि महाप्रसाद 11 सप्टेंबर 2024 बुधवार रोजी
ज्येष्ठा गौरी विसर्जन 12 सप्टेंबर गुरुवार 2024 रोजी
 
11 सप्टेंबर 2024 ज्येष्ठागौरी पूजन शुभ मुहूर्त:-
ब्रह्म मुहूर्त- प्रात: 04:32 ते 05:18 पर्यंत
प्रातः सन्ध्या- प्रात: 04:55 तेसे 06:04 पर्यंत
अमृत काल- दुपारी 12:05 ते 01:46 पर्यंत
विजय मुहूर्त- दुपारी  02:22 ते 03:12 पर्यंत
गोधूलि मुहूर्त- संध्याकाळी 06:31 ते 06:54 पर्यंत
सन्ध्या- संध्याकाळी 06:31 ते 07:40 पर्यंत
या वेळेत कधीही पूजन करता येऊ शकत मात्र अमृत काळात पूजन करणे सर्वोत्तम.
 
गौरी पूजन दुसरा दिवस
दुसर्‍या दिवशी ज्येष्ठा नक्षत्रावर गौरींचे महापूजन होतं. या दिवशी पाना-फुलांची आरास करतात, शेवंतीची वेणी माळवतात. हार, चाफ्याचे फूल, केवड्याचे पान वाहतात. गौरीची स्थापना झाल्यानंतर दुसर्‍या दिवशी ज्येष्ठ नक्षत्रावर महालक्ष्मीची पूजा करतात व महानैवेद्य दाखवितात. माहेरी आलेल्या गौरीला विशिष्ट प्रकाराचे पदार्थ खाऊ घालण्याची पद्धत आहे. गौरींना वेगवेगळे फळे अर्पण केली जातात आणि धान्यांच्या राशी लावल्या जातात. अनेक ठिकाणी आपल्या परंपरेनुसार नैवेद्याचा फुलोरा तयार केला जातो. माहेरवाशीण ज्येष्ठ गौरीला पुराणाचा नैवेद्य दाखवतात. नैवेद्याला १६ भाज्या, १६ कोशिंबिरी, १६ चटण्या, १६ पक्वान्ने तसेच फराळाचे पदार्थ करतात. पुरणाची १६ दिव्यांनी आरती करतात. संध्याकाळी हळदी-कुंकवाचा समारंभ केला जातो. अनेक जागी रात्री झिम्माफुगड्या, घागरी फुंकणे असे खेळ खेळून जागरण केले जाते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती