त्रैलोक्यावर चढाई केली. युद्धात भगवान विष्णू आणि शिवालाही पराजित केले. संपूर्ण ब्रह्मंडावर असुराचे राज्य निर्माण झाले. देव कारागृहात बंदिस्त झाले. त्यांनी विघ्नराजाची पूजा सुरू केली. त्याने प्रसन्न होऊन भगवान प्रकटले. देवतांनी ममतासुराचा उच्छाद सांगितला. विघ्नराजने नारदामार्फत ममतासुराकडे शरण येण्याचा संदेश पाठवला. अहंकारी ममतासुराने त्याला दाद दिली नाही. तेव्हा विघ्नराज क्रोधित झाले. विघ्नराजांनी आपल्या हातातील कमळ असुरसेनेत सोडले. त्याच्या गंधाने असुर मूर्छित झाले, शक्तिहीन झाले. ममतासुर भीतीने थरथर कापू लागला. त्याने विघ्नराजाच्या चरणी लोळण घेतली, क्षमायाचना केली. त्याला अभयदान देत विघ्नराजने त्याला पाताळात पाठवून दिले. देवतागण चहूकडे विघ्नराजाचा जजकार करू लागले.