पौराणिक कथेनुसार एकदा अंधक नावाचा राक्षस आई पार्वती वर आसक्त होऊन त्यांना बळजबरीने धरण्याचा प्रयत्न करू लागत असताना देवीने भगवान शिवाला विनवणी केली. शिवाने आपल्या त्रिशूळाने त्याला ठार मारले पण त्याचा मायावी सामर्थ्यामुळे त्याचा रक्ताचे थेंब जमिनीवर पडल्यावर प्रत्येक थेंबा पासून एक राक्षसी 'अंधका' जन्मली. म्हणजे हे रक्ताचे थेंब देखील एका प्रकारच्या राक्षसाप्रमाणे होते, या रक्ताची थेंब जमिनीवर पडल्या वर ती राक्षसी अंधका बनायची.
अश्या परिस्थितीत महादेवासमोर एक समस्या उद्भवली की आता काय करावं ? आता एकच मार्ग आहे की रक्ताचा एकही थेंब जमिनीवर पडायला नको. तेव्हाच ती राक्षसी ठार होणार. अशा परिस्थितीत पार्वतीने विचार केले की प्रत्येक स्त्रीमध्ये एक पुरुष असतो आणि प्रत्येक पुरुषात एक स्त्रीच असते. तेव्हा त्यांनी सर्व देवतांना बोलवले ज्यामुळे सर्व देवांनी आपल्या स्त्रीच्या स्वरूपाला पृथ्वीवर पाठविले जेणे करून जमिनीवर पडणाऱ्या प्रत्येक थेंबाला ते पिऊन घेतील. इंद्रा पासून इंद्राणी, ब्र्हमापासून ब्राह्मणी, विष्णू पासून वैष्णवी शक्ती पृथ्वीवर पाठवली.