गणेश विसर्जनाचा कार्यक्रम

शनिवार, 26 सप्टेंबर 2015 (12:46 IST)
भाद्रपद शुद्ध चतुर्दशीला(अनंत चतुर्दशी) गणेश विसर्जन करतात.यादिवशी मोदकाचा नैवेद्य करावा. दुपारी आरती करून नैवेद्य दाखवावा. संध्याकाळी पुन्हा आरती करावी. गणपतीची मूर्ती आसनावरून खाली ठेवावी. मग ती ताम्हणात घ्यावी. मूर्ती घेणार्‍याने डोक्यावर टोपी घालावी.
 
भाद्रपद शुद्ध चतुर्दशीला(अनंत चतुर्दशी) गणेश विसर्जन करतात.यादिवशी मोदकाचा नैवेद्य करावा. दुपारी आरती करून नैवेद्य दाखवावा. संध्याकाळी पुन्हा आरती करावी. गणपतीची मूर्ती आसनावरून खाली ठेवावी. मग ती ताम्हणात घ्यावी. मूर्ती घेणार्‍याने डोक्यावर टोपी घालावी. गणपती घेणार्‍याने मागे वळून पाहू नये. गणपतीला सर्व घरात फिरवून घर दाखवावे. विसर्जनाच्या ठिकाणी आरती करून, खिरापतीचा नैवेद्य दाखवावा. शक्यतो वहात्या पाण्यात विसर्जन कारावे. नसल्यास स्वच्छ पाण्यात विसर्जन करावे. येताना विसर्जनाच्या पाण्यातील माती घरी आणावी, ती जेथे गणपतीची मूर्ती बसवली होती तेथे ठेवावी.
 

वेबदुनिया वर वाचा