Friendship Day Quotes In Marathi मैत्रीवर महान लोकांचे विचार

मंगळवार, 27 जुलै 2021 (09:03 IST)
मित्र नेहमी अंलकाराप्रमाणे केवळ सौंदर्य वाढविणारे नसावेत,
स्तुती करणारे मित्र आपल्याला अनेक मिळतील,
पण आरश्याप्रमाणे आपले गुणदोष दाखविणारे मित्र,
दैवानेच लाभतात… – व.पू. काळे
 
मैत्री एक सोपी व्याख्या आहे…
रोज आठवण यावी असं काही नाही,
रोज भेट व्हावी असं काही नाही,
एवढंच कशाला रोज भेट व्हावी
असंही काहीच नाही,
पण मी तुला विसरणार नाही,
ही झाली खात्री आणि
तुला याची जाणिव असणं ही झाली मैत्री – पु. ल. देशपांडे
 
मैत्रीची परिक्षा संकटात केलेल्या मदतीने होते आणि ती मैत्री बिना शर्तींची असणं गरजेचं आहे – महात्मा गांधींचे विचार
 
जो टीका करतो मात्र मैत्री तुटेल याच्या भितीने सावध राहतो तो तुमचा मित्र नाही – गौतम बुद्ध
 
मैत्री हा जर तुमचा विकपॉईंट असेल तर तुम्ही जगातील शक्तीमान व्यक्ती आहात – अब्राहम लिंकन
 
मैत्री परिस्थितीचा विचार करत नसते, जर विचार करत असेल तर समजून घ्या मैत्री नाहीये. - मुन्शी प्रेमचंद
 
प्रकृती जनावरांनादेखील आपले मित्र ओळखण्याची समज देते. - कॉर्नील
 
जो आपल्याला वाईट मार्गावर जाण्यापासून वाचवतो, योग्य मार्ग दाखवतं आणि संकट काळात तुमचा साथ देतो तोच खरा मित्र आहे. - तिरुवल्लुवर
 
दुनियेतील कोणत्याच गोष्टीचा आनंद तो पर्यंत परिपूर्ण नसतं जोपर्यंत तो आनंद मित्रासोबत घेतला नसेल. - लॅटिन
 
शहाणा मित्र जीवनाचा सर्वात मोठा वरदान आहे. - यूरीपिडीज
 
सर्वांशी चांगले वागा पण सर्वोत्तम असलेल्याच मित्र बनवा. - इसोक्रेटस
 
मित्र दुःखात राहत देतो, संकटात मार्ग दर्शन करतो, जीवनाची खुशी, जमिनीतील खजिना आणि मानवी रूपात देवदूत असतो. - जोसेफ हॉल
 
मैत्री दोन घटकांनी बनली आहे, सत्य आणि प्रेम. - एमर्सन
 
 खर्‍या मैत्रीत उत्तम वैद्याप्रमाणे निपुणता आणि कौशल्य असतं, मातेप्रमाणे धैर्य आणि प्रेम असतं. अशी मैत्री करण्याचा प्रयास केला पाहिजे. -रामचंद्र शुक्ल
 
जीवनात मैत्रीहून अधिक सुख कशात नाही. - जॉन्सन

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती