Friendship Day 2023 Wishes : मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
रविवार, 6 ऑगस्ट 2023 (09:11 IST)
1 काही शब्द नकळत कानावर पडतात
कोणी दूर असुनही उगाच जवळ
वाटतात खर तर ही मैञीची नाती
अशीच असतात आयुष्यात येतात
आणि आयुष्यच बनून जातात
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
2 मैत्रीला नसतात शब्दांची बंधने,
त्याला असतात ती फक्तहदयाची स्पंदने,
मैत्री व्यक्त करण्यासाठी कधी कधी शब्द अपुरे पडतात,
पण अंतःकरणापासुन व्यक्त केले तर
चेहऱ्यावरील भावही पुरेसे असतात.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
3 मैत्री असावी चंदनासारखी,
सुगंध देणाऱ्या फुलासारखी,
जशी तुटलेल्या ताऱ्याला आधार देणाऱ्या धरतीसारखी,
प्रकाशाचे तेज घेऊन सावलीसारखी कोमल असावी.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
4 बंधना पलीकडे एक नाते असावे,
शब्दांचे बंधन त्याला नसावे,
एक प्रेमळ भावनांचा आधार असावा,
दु:खाला तिथे थारा नसावा,
असा गोडवा एक आपल्या मैत्रीत असावा.
मैत्रीदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!
5 जीवनाच्या प्रत्येक वळणावर आठवण येत राहील.
एकत्र नसलो तरी सुगंध मैत्रीचा दरवळत राहील.
कितीही दूर जरी गेलो तरी,
मैत्रीचे हे नाते आज आहे तसेच उद्या कायम राहील.
मैत्रीदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!
6 रक्ताची नाती जन्माने मिळतात,
मानलेली नाती मनाने जुळतात,
पण नाती नसतानाही जी बंधनं जुळतात,
त्या रेशमी बंधनांना मैत्री म्हणतात.
मैत्रीदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!
7 तेज असावे सूर्यासारखे,
प्रखरता असावी चंद्रासारखी,
शीतलता असावी चांदण्यासारखी,
आणि मैत्री असावी तुझ्यासारखी.
मैत्रीदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!
8 मैत्री एक अलगद स्पर्श मनाचा
मैत्री एक अनमोल भेट जीवनाची,
मैत्री एक अनोखा ठेवा आठवणींचा,
मैत्री एक अतूट सोबत आयुष्याची.
मैत्रीदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
9 मैत्री असावी प्रकाशासारखी मनाचा
आसमंत उज्ज्वल करणारी,
मैत्री असावी स्वप्ऩांना सत्यात उतवणारी,
मैत्री असावी विश्वासाची हिशेबाची उठाठेव न करणारी,
मैत्री असावी सुखाची साथीदार अन दुःखाची भागीदार
मैत्रीदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
10 मैत्रीही नेहमी गोड असावी,
जीवनात तिला कशाची तोड नसावी,
सुखात ती हसावी, दुःखात ती रडावी,
पण, आयुष्यभर ती आपल्या सोबत असावी.
मैत्रीदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
Edited by - Priya Dixit