परदेशात शिक्षण घ्यायचे असेल तर त्यासाठी आवश्यक असणारी माहिती तुमच्याजवळ हवी. त्यामुळे अनेकदा केवळ माहिती नसल्याने आपण संधींना मुकतो. परदेशात शिक्षण घेण्याचा मार्ग खडतर असला तरी त्यासाठी पूर्वतयारी केल्यास फारशा अडचणी येत नाहीत. परदेशात शिक्षण घेण्यासाठी काही पूर्वपरीक्षा द्याव्या लागतात. त्याची माहिती आपल्याला हवी. तीच येथे देण्याचा प्रयत्न केला आहे.
परदेशात जाण्यासाठी प्रामुख्याने या परीक्षांचा विचार करा: 1. जीआरई अर्थात ग्रॅजुएट रेकॉर्ड एक्झामिनेशन 2. जी मेट अर्थात ग्रॅजुएट मॅनेजमेंट एडमिशन टेस्ट 3. टोफेल अर्थात टेस्ट ऑफ इंग्लिश एज ए फॉरेन लँग्वेज 4. सेट अर्थात स्कालिस्टिक एटीट्यूड
ग्रेजुएट रेकॉर्ड एक्जामिनेशन (जी. आर. ई.) अमेरिकेत किंवा कॅनडात शिक्षणासाठी जायचे असेल तर, तुम्हाला ही परीक्षा उत्तीर्ण होणे गरजेचे आहे. यासाठी खालील प्रश्न अपेक्षित असतात.
1. इंग्रजी वाचनाची परीक्षा 2. इंग्रजी शब्दसंग्रह 3. वाक्याचा अर्थ 4. वाचन क्षमता 5. गणितीय योग्यता 6. तुलनात्मक अभ्यास 7. सांख्यिकीय योग्यता 8. विश्लेषण योग्यता 9. तर्कबुद्धी परीक्षण
साधारणत: 2 हजार मार्कांची ही परीक्षा तीन टप्प्यात घेण्यात येते. ही परीक्षा खालील केंद्रांवर घेण्यात येते. 1. बेंगलुरू 2. मुंबई 3. कोलकाता 4. दिल्ली 5. चेन्नई
जुलैनंतर याची माहिती पुस्तिका खालील पत्त्यावर आपल्याला मिळू शकते. इंन्स्टिट्यूट ऑफ सायकोलॉजिकल एण्ड एज्युकेशनल मेजरमेंट (आय. पी. ई. एम.) 25-ए, महात्मा गांधी मार्ग अलाहाबाद - 9
ग्रॅजुएट मॅनेजमेंट एडमिशन टेस्ट (जीएमएटी) अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि ब्रिटनमध्ये प्रवेश घेताना जी. एम. ए. टी. परीक्षा उत्तीर्ण होणे गरजेचे आहे. यासाठी केवळ 30 मिनिटांचा कालावधी आपल्याला मिळतो. यात आपल्याला खालील प्रश्न विचारले जातात,
1. इंग्रजी वाचनाची परीक्षा 2. इंग्रजी शब्दसंग्रह 3. वाक्याचा अर्थ 4. वाचन क्षमता 5. गणितीय योग्यता 6. तुलनात्मक अभ्यास 7. सांख्यिकीय योग्यता 8. विश्लेषण योग्यता 9. तर्कबुद्धी परीक्षण
परीक्षेत प्रत्येक प्रश्नाला पाच संभाव्य उत्तरे दिली असतात. त्यात आपल्याला योग्य उत्तर निवडायचे असते. तुम्ही चुकीचे उत्तर दिले तर तुमचे अंक वजा होतात. 500 पेक्षा अधिक मार्क्स मिळवणाऱ्या विद्यार्थ्याला सामान्य प्रवेश तर 700 हून अधिक मार्क्स घेणाऱ्या विद्यार्थ्याला स्कॉलरशिप प्रवेश दिला जातो. खालील केंद्रांवर परीक्षा घेतली जाते.
बेंगलूरू मुंबई कोलकाता नवी दिल्ली
अधिक माहितीसाठी संपर्क: ग्रेजुएट मॅनेजमेंट एडमिशन टेस्ट एज्युकेशनल टेस्टिंग सर्विस बीओएस 966 प्रिसिंटन न्यूयॉर्क 08541, अमेरिका
टेस्ट ऑफ इंग्लिश एज ए फॉरेन लँग्वेज (टीओइएफएल) इंग्रजी भाषेचे तुम्हाला कितपत ज्ञान आहे, हे अभ्यासण्यासाठी तुम्हाला अमेरिका आणि कॅनडा सरकारच्या या परीक्षेत उत्तीर्ण व्हावेच लागते. त्याशिवाय पर्याय नाही. यासाठी तुमची छोटी परीक्षा घेतली जाते यात तुमची
1. इंग्रजीची श्रवणशक्ती 2. व्याकरण 3. वाचन योग्यता 4. वाक्यांची ओळख करण्याची क्षमता तपासली जाते. ही परीक्षा केवळ वस्तुनिष्ठ प्रश्नांवर आधारीत असते.550 मार्क्स मिळवणाऱ्या विद्यार्थ्याला सामान्य प्रवेश तर 677 मार्क्स मिळवणाऱ्या विद्यार्थ्याला स्कॉलरशिप मिळू शकते.
खालील केंद्रांवर ही परीक्षा घेतली जाते. 1. अलीगढ 2. भोपाळ 3. कोचीन 4. दार्जिलिंग 5. गुंटूर 6. कानपूर 7. कोडईकनाल 8. मेंगलोर 9. मसुरी 10. पंतनगर 11. पाटणा 12. श्रीनगर 13. वाराणसी
अधिक माहितीसाठी संपर्क: इंन्स्टिट्यूट ऑफ बाइकोलॉजिकल एण्ड एज्युकेशनल मेजरमेंट (आय. पी. ई. एच. ) 25 ए, महात्मा गांधी मार्ग अलाहाबाद 211001 फोन : (532) 624881