परदेशात कोणतीही डिग्री मिळवली की शिक्षणाचे महत्त्व वाढते असा एक समज आशियातील विद्यार्थ्यांमध्ये आहे. बारावीनंतरच मग याची तयारी सुरू होते आणि घाईघाईत घेतलेल्या निर्णयांमुळे पैसे तर वाया जातातच परंतु मनस्ताप सहन करावा लागतो तो वेगळा.
भारतीय विद्यार्थ्यांचा ओढा 1970 च्या दशकात इंग्लंडकडे अधिक होता. परदेशी शिक्षण म्हटल्यानंतर लंडन किंवा इंग्लंडच्या प्रमुख विद्यापीठांचे नाव पुढे येई.
ही परंपरा 90 च्या दशकापर्यंत सुरूच होती. आता काळ बदलला आहे. इंग्लंड व्यतिरिक्त ऑस्ट्रेलिया जर्मनी, जपान, रशिया, फ्रान्स, आणि अमेरिका या देशांकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढला आहे.
अमेरिकेत आज घडीला विविध क्षेत्रात भारतीयांचा बोलबाला आहेच. परंतु, गेल्या काही दिवसांमध्ये भारतीयांचे अमेरिकेत शिक्षणासाठी जाणे वाढले आहे.
अमेरिकेतील शिक्षण अमेरिकेत अनेक खाजगी आणि सरकारी विद्यापीठ आहेत. यात 226 राष्ट्रीय तर 500 प्रादेशिक विद्यापीठांचा समावेश होतो. यात विविध विषय शिकवले जातात. वर देण्यात आलेली संख्या ही केवळ विद्यापीठांचीच असल्याने यापेक्षा कितीतरी अधिक पटीने येथे महाविद्यालये आहेत हेही लक्षात ठेवणे गरजेचे आहे.
संकेतस्थळांवर या सर्वांची माहिती मिळतेच यात शंका नाही परंतु त्यांचा दर्जा नेमका काय हे मात्र भारतात बसून ठरवणे अशक्यप्राय गोष्ट आहे.
अमेरिकेतील प्रमुख शिक्षण संस्था लॉ शिक्षणासाठी न्यूयॉर्क विद्यापीठ कोलंबिया विद्यापीठ येल विद्यापीठ स्टेनफोर्ड विद्यापीठ, हावर्ड विद्यापीठ शिकागो विद्यापीठ व्हर्जीनीया विद्यापीठ कॉरनेल विद्यापीठ
कलाशाखा आर्ट सेंटर कॉलेज ऑफ डिझाइन, कॅलिफोर्निया, ब्लुमिंटन आयोवा विद्यापीठ, कॉलेज ऑफ आर्ट्स एड क्राफ्टस मेरीलँड
बिझनेस स्टडीज कोलंबिया विद्यापीठ नॉर्थ वेस्टर्न विद्यापीठ हावर्ड विद्यापीठ पेनसेल्वीनीया विद्यापीठ
मेडिकल अभ्यासासाठी हावर्ड विद्यापीठ सेंट लुईस विद्यापीठ कॉलेज ऑफ फिजीशियन्स एड सर्जन फोर्ड विद्यापीठ
परदेशात शिक्षणाला जाण्यापूर्वी ही काळजी अवश्य घ्या 1. संस्था, महाविद्यालय, किंवा विद्यापीठाची संपूर्ण माहिती घ्या. 2. विद्यापीठांचा निकाल, आपल्याला हवे असलेले विषय यांची पडताळणी करा. 3. विद्यापीठातील वातावरण कसे आहे याची कसून चौकशी करा. 4. विद्यापीठात राहण्याची व्यवस्था असेल तर भारतीय विद्यार्थी त्यात किती आहेत, याची चौकशी करा. 5. अमेरिकेतील विद्यापीठांना लागलेले ग्रहण म्हणजे परदेशी विद्यार्थ्यांवर होणारे हल्ले, त्यामुळे सुरक्षिततेची संपूर्ण चौकशी करा. 6. महाविद्यालयातील ग्रंथालयात तुमच्या अभ्यासाची किती पुस्तके आहेत हे पडताळून पाहा. 7. विद्यापीठात राहण्याची व्यवस्था नसेल तर अशा वेळी तेथील भारतीय मंडळाशी संपर्क साधून त्यांच्याकडून माहिती घ्यावी. 8. आपल्या पासपोर्टवर नेमक्या किती कालावधीसाठी आपल्याला परदेशात जाण्याची परवानगी स्वीकारण्यात आली याची खात्री करून घ्या.