गुरूवारी जागणार 26/11 च्या आठवणी!

वेबदुनिया

बुधवार, 25 नोव्हेंबर 2009 (18:50 IST)
ND
ND
२६ नोव्हेंबर २००८. कॅलेंडरची पाने पटापट उलटत गेली नि आता २६ नोव्हेंबर २००९ उजाडतोय. मुंबईत गेल्या वर्षी झालेल्या दहशतवादी हल्ल्याची वर्षपूर्ती होतेय. या नृशंस हल्ल्याच्या आठवणी आता या निमित्ताने पुन्हा एकदा जाग्या होणार आहेत.

या हल्ल्याच्या निमित्ताने मुंबई पोलिस अधिकार्‍यांत सध्या आरोप-प्रत्यारोप सुरू असले तरी सर्वसामान्य मात्र या हल्ल्याच्या आठवणींनी हेलावून गेला आहे. मुंबईच्या या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी विविध कार्यक्रम या दिवशी होत आहेत. शिवाय पोलिस दलातर्फेही काही कार्यक्रम होणार आहेत.

मुंबई पोलिसांचे संचलन होणार आहे. यात नवी शस्त्रे आणि नवी वाहने लोकांसमोर आणण्यात येतील. केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम दक्षिण मुंबईतील पोलिस जिमखान्यात शहिद स्मारकाचे अनावरण करतील. त्याचवेळी गेट वे ऑफ इंडिया येथे प्रार्थना सभा होईल.

वेबदुनिया वर वाचा