उड़ता पंजाबमध्ये चार लोक, टॉमी सिंह (शाहिद कपूर), कुमारी पिंकी (आलिया भट्ट), प्रीत साहनी (करीना कपूर खान) आणि सरताज सिंह (दलजीत दोसांझ)ची कथा आहे.
टॉमी सिंह रॉक स्टार आहे. कुमारी पिंकी बिहारहून पंजाबात आलेली मजूर मुलगी आहे. प्रीत डॉक्टर आहे आणि सरताज पोलिसाची नोकरी करत असतो. या सर्वांमध्ये एक साम्य आहे ते म्हणजे 'पंजाब'.
समाजाच्या वेग वेगळ्या वर्गातून आलेले हे लोक ड्रग्सचा धोका आणि दुष्परिणामांवर आपल्या पातळीवर संघर्ष करतात. ह्या चित्रपटात यांची लढाई दाखवली आहे.
चित्रपटात पंजाबमध्ये राहून लढण्याचा साहस आणि भावनेला सुंदररीत्या दाखवण्यात आले आहे.