FIFA विश्वचषक 2022 मध्ये स्वित्झर्लंडने कॅमेरूनचा 1-0 असा पराभव करून विजयी सुरुवात केली आहे. या सामन्याच्या सुरुवातीपासूनच स्वित्झर्लंडचा संघ फेव्हरेट मानला जात होता, मात्र पूर्वार्धात कॅमेरूनने जबरदस्त खेळ दाखवला. दोन्ही संघांमध्ये निकराची लढत झाली. मात्र, पूर्वार्धात कोणत्याही संघाला गोल करता आला नाही. दुसऱ्या हाफला सुरुवात होताच स्वित्झर्लंडने अप्रतिम गोल करत १-० अशी आघाडी घेतली. 48व्या मिनिटाला शकीरीच्या उत्कृष्ट पासचे एम्बोलोने गोलमध्ये रुपांतर केले. यानंतरही दोन्ही संघांनी गोल करण्याचा आटोकाट प्रयत्न केला, मात्र त्यांना यश मिळाले नाही. एम्बोलोचा गोल निर्णायक ठरला आणि नेदरलँड्सने उलटफेरातून स्वतःला वाचवले.
या सामन्यात स्वित्झर्लंडकडे चेंडूवर51 टक्के तर कॅमरूनकडे 49 टक्के नियंत्रण होते. दोन्ही संघांचे खेळाडू दोनदा ऑफसाईडही होते. मात्र, स्वित्झर्लंडला 11 कॉर्नर मिळाले, तर कॅमेरूनला केवळ पाच कॉर्नर मिळाले. स्वित्झर्लंडच्या दोन आणि कॅमेरूनच्या एका खेळाडूला यलो कार्ड मिळाले.
कॅमेरूनने गोलचे आठ प्रयत्न केले. यातील पाच शॉट्सही लक्ष्यावर होते, पण या संघाला एकाही गोल करता आला नाही. या सामन्यात स्वित्झर्लंडच्या गोलकीपरने अनेक उत्कृष्ट सेव्ह केले. त्याचवेळी स्वित्झर्लंडने गोल करण्याचे सात प्रयत्न केले. यापैकी तीन लक्ष्यावर होते आणि एकात संघ गोल करण्यात यशस्वी ठरला.
70 मिनिटांचा खेळ संपेपर्यंत स्वित्झर्लंडचा संघ 1-0 ने आघाडीवर होता. सामन्यातील एकमेव गोल 48व्या मिनिटाला झाला. एम्बोलोने गोल केला. पूर्वार्धात दोन्ही संघांमध्ये निकराची लढत झाली, मात्र उत्तरार्धात स्वित्झर्लंडने चांगला खेळ दाखवला आणि हा संघ सध्या आघाडीवर आहे.