फिफा विश्वचषकाच्या तिसऱ्या दिवशी मोठे चढ-उतार पाहायला मिळाले. विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या अर्जेंटिनाच्या संघाचा जागतिक क्रमवारीत 49व्या क्रमांकावर असलेल्या सौदी अरेबियाचा 2-1 असा पराभव झाला. या पराभवामुळे अर्जेंटिनाचा पुढचा मार्ग कठीण झाला. आता अर्जेंटिना 27 नोव्हेंबरला मेक्सिको आणि 30 नोव्हेंबरला पोलंड आहे. या पराभवासह अर्जेंटिनाचा संघ क गटात शेवटच्या स्थानावर पोहोचला आहे.
लिओनेल मेस्सीने 10 व्या मिनिटाला एक गोल करुन अर्जेंटिनाला आगेकूच करण्याची संधी दिली होती.
त्याने सौदीविरोधात पेनल्टीवर गोल केला. या गोलमुळे अर्जेंटिना 1-0 अशी पुढे होती. अर्जेंटिनासाठी दुसरा गोल लोटारो मार्टिनेझने केला. मात्र पंचांनी तो बाद ठरवला. त्यानंतर सौदी अरेबियाने 48 व्या मिनिटाला पहिला गोल केला. हा गोल सौदीच्या सालेह अलशेहरीने केला होता. 53 व्या मिनिटाला सौदी अरेबियासाठी सालेम अलडसारीने दुसरा गोल केला.
सौदी अरेबियाचा गोलरक्षक एम. अल ओवेसने शेवटच्या काही मिनिटांत चमकदार कामगिरी करत अनेक बचाव केले. अर्जेंटिनाने सुरुवातीच्या काही मिनिटांत तीन गोल केले, परंतु ते सर्व ऑफसाइड ठरले. अर्जेंटिनाचा संघ ऑफसाईड झेलला गेला. या पराभवासह अर्जेंटिनाची सलग 36 सामन्यांची विजयी मालिका खंडित झाली. यादरम्यान त्याने 25 सामने जिंकले आणि 11 सामने अनिर्णित राहिले. सौदी अरेबियाचा विश्वचषक इतिहासातील हा केवळ तिसरा विजय ठरला.