पैसा ओढतो हा पौधा, आजच आणा घरी!

तसे तर पैसे कमावण्यासाठी सर्वजण जिवापाड मेहनत करतात, पण बर्‍याच वेळा असे देखील होते की एवढी मेहनत करूनही घरात पैसे येत नाही. यासाठी बरेच वास्तू उपाय आहे आणि असे देखील म्हटले जाते की घरात मनी प्लांट लावून बघा. हा फार प्रचलित उपाय आहे आणि जास्त करून घरांमध्ये हा तुम्हाला मिळतो देखील. पण तुम्ही कधी 'क्रासुला'चे नाव ऐकले आहे? याला देखील मनी ट्री म्हटले जाते. तुम्हाला याच्याबद्दल जास्त माहिती देत आहोत.  
 
ज्या प्रकारे आमच्या येथे वास्तू शास्त्र असते, तसेच चीनमध्ये फेंगशुईची विद्या आहे आणि याच्यानुसार एक पौधा असा आहे, ज्याला फक्त घरात ठेवल्यानेच हा पैसा आपल्याकडे ओढतो. या पौध्याला क्रासुला म्हणतात आणि हा एक पसरणारा पौधा आहे, ज्याचे पानं मोठे असतात. पण हात लावल्याने मखमली जाणवतात. या पौध्याच्या पानांचा रंग न तर पूर्ण हिरवा न पिवळा असतो. हे दोन्ही रंगांनी मिश्रित पानं असतात, पण इतर पौध्यांच्या पानांप्रमाणे याचे पान नाजुक नसून नुसते हात लावल्याने तुटत ही नाही आणि मोडल्या देखील जात नाही.   
 
जो पर्यंत याच्या देखरेखचा प्रश्न येतो तर मनी प्लांटप्रमाणे या पौध्यासाठी जास्त परेशान होण्याची गरज नसते. जर तुम्ही या रोपट्याला दोन तीन दिवस पाणी नाही दिले तरी ते वाळणार नाही. क्रासुला घरात देखील वाढू शकतो. हा पौधा जास्त जागा घेत नाही.  
 
याला तुम्ही लहान कुंड्यात देखील लावू शकता. आता जर धन प्राप्तीची गोष्ट केली तर फेंगशुईनुसार क्रासुला चांगल्या ऊर्जांप्रमाणे धनाला घरात ओढतो. या पौध्याला घराच्या प्रवेश दाराजवळच लावायला पाहिजे. जेथून प्रवेश दार उघडत त्याच्या उजवीकडे हा  पौधा ठेवायला पाहिजे. काही दिवसांमध्ये हा पौधा आपला प्रभाव दाखवणे सुरू करतो आणि घरात सुख शांती येणे सुरू होते.

वेबदुनिया वर वाचा