कृती-
सर्वात आधी साबुदाणा पाण्यात भिजत ठेवावा. यानंतर, एका पॅनमध्ये दूध मध्यम आचेवर उकळवा. आता साबुदाणा मधून पाणी गाळून घ्या आणि दुधात घाला आणि मंद आचेवर शिजवा. तसेच ढवळत राहा.आता दूध घट्ट झाल्यावर त्यात साखर मिसळा आणि गॅस बंद करा. यानंतर त्यात क्रीम, चिरलेला सफरचंद, केळी मिसळा मिक्स करा. काही वेळ फ्रीजमध्ये ठेवा. मिश्रण थंड झाल्यावर ते एका ग्लासमध्ये भरा. तसेच आता त्यात वरून डाळिंबाच्या बिया, चेरी, गुलाबाच्या पाकळ्या आणि केशराच्या धाग्यांनी सजवा. तर चला तयार आहे आपली उपवासाची साबुदाणा रबडी, नक्कीच सर्व्ह करा.