साहित्य : 2 कच्ची केळी उकडून सोलून मॅश केलेली, 2 बटाटे उकडलेले साल काढून मॅश केलेले, 1/2 कप साबुदाण्याचे पीठ, 1-1 चमचा आलं, हिरव्या मिरच्या बारीक काप केलेल्या, काळेमिरे पूड, मीठ व पोदिना पावडर, कोथिंबीर बारीक चिरलेली, तळण्यासाठी तेल व पनीर 100 ग्रॅम.
कृती : सर्वप्रथम पनीराचे 1-1 इंच लांबीचे तुकडे करून त्यावर थोडंसं मीठ व काळेमिरे पूड घालून ठेवावे. तेल व पनीर सोडून बाकी सर्व साहित्य एकजीव करून त्याचे गोळे तयार करावे. एक गोळा घेऊन हातावर पसरवून त्यात 1 पनीराचा तुकडा ठेवावा व पूर्णपणे बंद करावे. तेल गरम करून सोनेरी होईपर्यंत गोळे तळून घ्यावे. बनाना बॉल्स तयार आहे आता या बॉल्सला तुम्ही हिरवी चटणीसोबत सर्व्ह करा.