साबुदाण्याचे पापड

शुक्रवार, 13 मे 2016 (17:23 IST)
साहित्य : एक वाटी साबुदाणा, दोन वाटी पाणी, मीठ, जिरं. 
 
कृती : सर्वप्रथम रात्री गार पाण्यात साबूदाणा धुऊन भिजत घालावा. दुसर्‍या दिवशी सकाळी दोन वाट्या पाण्याच्या आधणात चवीपुरते मीठ घालावे व त्यात भिजवून ठेवलेला साबूदाणा घालून चांगला शिजवावा आणि प्लॅस्टिकच्या कागदावर पळीने किंवा चमच्याने, हव्या असतील, तशा लहान किंवा मोठ्या पापड्या घालाव्यात. जर आवडत असेल तर त्यात थोडे जिरे ही घालू शकता. वाळल्यावर त्या तळून खाव्या.

वेबदुनिया वर वाचा