शेंगदाण्याची आमटी

सोमवार, 19 ऑक्टोबर 2015 (14:57 IST)
साहित्य: 2 कप शेंगदाणे मीठ घातलेल्या पाण्यात रात्री भिजत ठेवा. 3 हिरव्या मिरच्यांचे तुकडे, 1 चमचा जिरे, 2 चमचे साजूक तूप, ओलं खोबरं, कोथिंबीर, आमसुलाचं पाणी, गूळ, तिखट, मीठ, साखर चवीनुसार, 1 चमचा दाण्याचा कूट.


 
कृती: भिजवलेले दाणे व मिरच्यांचे तुकडे एकत्र करून, कुकररमध्ये उकडून घ्या. पाणी घालू नका, म्हणजे दाणे शिजलेले पण सुटे राहतील. तूप, जिरे घालून फोडणी करा. त्यात थोडं लाल तिखट घाला. शिजलेले दाणे, खोबरं, दाण्याचा कूट, साखर, मीठ घाला. गार झाल्यावर लिंबाचा रस घाला. देताना खोबरं, कोथिंबीर व जिरेपूड घालून खायला द्या.

वेबदुनिया वर वाचा