नागपूरमधील नॅशनल एपोस्टॉलिक चर्च एज्युकेशन सोसायटीचे डॉ बॉवर एपोस्टॉलिक ज्युनिअर कॉलेजची स्थापना 1997 मध्ये विन्सेंन्ट वि. बॉवर यांनी केली.
गरीबांना इंग्रजीतून शिक्षण मिळावे यासाठी शाळा स्थापन करण्यात आली. कॉलेज 2003 मध्ये सुरू करण्यात आले. सायन्स, कॉमर्स, आयटी आणि यावर्षापासून इलेक्ट्रॉनिक आदी शाखा या कॉलेजमध्ये आहेत. शाळेच्या अनेक शिक्षकांना गुणवंत पुरस्कार मिळाला आहे. श्रीमती एलिस बॉवर यांना 2004 मध्ये राष्ट्रपती पुरस्कार मिळाला आहे. शाळेचे एक नाटक राष्ट्रीय पातळीवर सादर झाले आहे. प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका वंदना बेंजामिन आहेत. तर विनिता बॉवर यांच्यावर हायस्कूलची जबाबदारी आहे.