पंडित मोतीलाल नेहरू मराठी निबंध

मंगळवार, 6 फेब्रुवारी 2024 (08:01 IST)
पंडित मोतीलाल नेहरू हे पंडित जवाहरलाल नेहरू यांचे वडील होते. पंडित मोतीलाल नेहरू यांचा जन्म 6 मे 1861 ला आगरा येथे एक कश्मीरी पंडित कुटुंबात झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर होते. भारताच्या स्वतंत्रता आंदोलनात पंडित मोतीलाल नेहरू हे एक असे व्यक्ती होते ज्यांनी आपली ऐशोआरामाचे जीवन त्यागून देशासाठी सर्वस्व अर्पण केले. पंडित मोतीलाल नेहरू हे अलाहाबाद येथे एक नामवंत वकील होते. त्या वेळी ते हजार रूपए फी घ्यायचे. तसेच ते गरिबांची पुष्कळ मदत करायचे. ते मोजलेल्या-निवडलेल्या त्या भारतीयांपैकी एक होते जे अत्यंत कुशाग्र बुद्धीचे ज्ञाता होते. त्यांनी अरबी आणि फारसी भाषेचे ज्ञान प्राप्त केले होते. त्यांना अभ्यास विशेष आवडत नसे पण जेव्हा त्यांनी अलाहाबाद हायकोर्टात वकिलिची परीक्षा दिली तेव्हा सर्व आश्चर्यचकित झाले. या परीक्षेत त्यांनी प्रथम क्रमांक मिळवून सोबत सुवर्ण पदक पण मिळवले होते.
 
1922 साली पंडित मोतीलाल नेहरू, देशबंधु चित्तरंजन दास, व लाला लाजपतराय यांच्या बरोबर काँग्रेस पक्षांतर्गत स्वराज पक्षाची स्थापना केली. तसेच 1928 साली कोलकत्ता येथे झालेल्या अधिवेशनात अध्यक्षपद त्यांनी भुषविले होते. पंडित मोतीलाल नेहरू भारताची भावी राज्यघटना बनवण्यासाठी नेमलेल्या समितीचे अध्यक्ष होते व या समितीचा रिपोर्ट हा 'नेहरू रिपोर्ट'या नवाने पण ओळखला जात होता. पंडित मोतीलाल नेहरुंच्या पत्नीचे नाव 'स्वरुप राणी' होते. त्यांना एक मुलगा आणि दोन मूली होत्या व त्यांच्या जेष्ठ कन्येचे नाव होते विजयालक्ष्मी. ज्या पुढे विजयालक्ष्मी पंडित म्हणून नावरुपास आल्या. तसेच कनिष्ठ कन्येचे नाव होते कृष्णा (हाथीसिंग) होते. व ते भारताचे पाहिले पंतप्रधान पंडित जवाहलाल नेहरूंचे वडील होते. पंडित मोतीलाल नेहरुंना कानपुर मध्ये खूप मान होता. त्या नंतर त्यांनी अलाहबाद उच्च न्यायालयात वकीली प्रारंभ केली ते 1910 मध्ये संयुक्त प्रदेश (उत्तरप्रदेश) विधानसभासाठी निवडले गेले. ते पश्चिमी वेशभूषा आणि विचारांनी खूप प्रभावित होते. पण गांधीजींच्या संपर्कात आल्या नंतर त्यांच्या जीवनात मोठा बदल झाला. त्यांनी गांधीजींच्या आव्हानावर 1919 मध्ये अमृतसरच्या जालियनवाला बाग हत्याकांड नंतर वकीली सोडून दिली. 
 
पंडित मोतीलाल नेहरूंबद्द्ल काही विशेष माहिती 
1. पंडित मोतीलाल नेहरू हे 1919 आणि 1920 असे दोनवेळेस कॉग्रेस अध्यक्ष म्हणून निवडले गेले. 
2. सन 1923 मध्ये देशबंधु चित्तरंजन दास यांच्यासोबत मिळून स्वराज्य पार्टीची स्थापना केली. 
3. सेन्ट्रल लेजिस्लेटिव असेब्मली जाऊन विपक्ष नेते बनले. 
4. त्यांनी स्वातंत्र्याच्या आंदोलनात भारतीय लोकांच्या पक्षमध्ये इंडिपेंडेंट वृत्तपत्र पण चालवले. 
5. भारत स्वतंत्र लढाईसाठी ते अनेकवेळा जेल मध्ये गेले. 
 
पंडित मोतीलाल नेहरू यांनी भारतीय स्वतंत्र लढ्यात खूप मोठे योगदान दिल आहे असे हे महान व्यक्तिमत्व असलेले पंडित मोतीलाल नेहरूंचे निधन 6 फेब्रुवारी 1931 मध्ये उत्तरप्रदेशातील लखनऊ येथे झाले. 

धनश्री नाईक 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती