शीला दीक्षितांची दिल्लीत 'हॅटट्रिक'

वार्ता

सोमवार, 8 डिसेंबर 2008 (13:12 IST)
मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी मतदारांनी पुन्हा एकदा कॉंग्रेसला दिलेल्या कौलाबद्दल आभार मानले आहेत. दीक्षित यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेसने दिल्लीत विजयाची 'हॅटट्रिक' केली आहे. सलग तिसर्‍यांदा पक्षाला विजय मिळवून देणार्‍या मुख्यमंत्री म्हणून श्रीमती दीक्षित यांची इतिहासात नोंद होईल. देशातही ज्योती बसूंनंतर सलग तीनदा सत्ता मिळविणाऱ्या त्या पहिल्याच मुख्यमंत्री आहेत.

पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या, की लोकांनी आमच्याबाजूने दिलेल्या कौलाने आम्ही आनंदी आहोत. अर्थात, पुढील पाच वर्षे आम्हाला कठोर मेहनत करावी लागेल.

आम्हाला आता लोकांचे जीवन अधिक आरामदायी करण्यावर भर द्यायचा आहे. त्यासाठी अनेक योजना आहे. त्या पूर्ण करण्यासाठी आम्हाला प्रयत्न करावे लागतील. रहाण्यासाठी चांगले शहर अशी कीर्ती आम्ही या शहराला देऊ इच्छितो, असेही त्या म्हणाल्या.

वेबदुनिया वर वाचा