म. प्र. कॉंग्रेससाठी आत्मनि‍रीक्षणाची वेळ

भाषा

सोमवार, 8 डिसेंबर 2008 (15:37 IST)
मध्य प्रदेशात कॉंग्रेसचा सलग दुसर्‍यांदा पराभव झाल्यानंतर पक्षाचे नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी सामूहिक आत्मनिरीक्षणाचे आवाहन केले आहे. मध्य प्रदेशात पक्षास पुनरूजिवित करण्यासाठी सामूहिक आत्मनिरीक्षण गरजेचे असल्याचे ते म्हणाले.

भरपूर काम केल्यानंतरही निवडणूकीत लोकांच्या दृष्टिने पक्ष कमी पडला आहे. पक्षाने अनेक प्रश्नी चांगली कामगिरी केली नाही, असे ते म्हणाले. मात्र त्यांनी स्पष्टिकरण दिले नाही. केंद्रीत माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री असलेले शिंदे यांनी पक्षाने मालवा भागात मार खाल्ल्याचे सांगितले.

मालव्यात राज्यातील एकूण २३० पैकी ८५ जागा आहेत. पक्षास सुधारणेसाठी भरपूर वाव असल्याचे ते म्हणाले. मध्यप्रदेशात नेतेपदावरून पक्षात काही मतभेद उद्भवले होते. पक्षातील एका गटाने वाणिज्यमंत्री कमलनाथ यांना नेते म्हणून प्रोजेक्ट करण्याचा प्रयत्न केला.

याविरूद्ध अखिल भारतीय कॉंग्रेस समितीने सुरेश पचौरी यांनी प्रदेशाध्यक्ष म्हणून जाहिर केले होते. भाजपने २००३ मध्ये १० वर्षापासून सत्तेत असलेल्या कॉंग्रेसकडून सत्ता हस्तगत केली होती. तेव्हापासून भाजपचा हा दूसरा विजय आहे.

वेबदुनिया वर वाचा