बुधवारी ठरणार राजस्थानचा मुख्यमंत्री?

भाषा

मंगळवार, 9 डिसेंबर 2008 (08:48 IST)
राजस्थानमध्ये वसुंधरा राजेंची सत्ता उलटल्यानंतर आता कॉग्रेसचा नवा मुख्यमंत्री कोण याचे वेध सर्वांना लागले आहेत. यातच गहलोत यांना टक्कर देण्यासाठी पक्षातील काही नेत्यांनी पुढाकार घेतल्याने गहलोत यांच्या मुख्यमंत्री पदाच्या मार्गात अडचणी निर्माण झाल्या आहेत.

राजस्थानच्या मुख्यमंत्री पदाची माळ गहलोत यांच्या गळ्यात घालायची का, इतर कोणाला ही जबाबदारी सोपवायची याचा निर्णय बुधवारी होण्याची शक्यता असून, निवडून आलेल्या कॉग्रेस उमेदवारांची बैठक बुधवारी जयपुरमध्ये घेण्यात येणार आहे. या बैठकीतच उमेदवारांकडून मुख्यमंत्रिपदाची चाचपणी होण्याची शक्यता आहे.

वेबदुनिया वर वाचा