दहशतवादाचे राजकारण करणार्‍यांवर दिक्षितांचा प्रहार

सोमवार, 8 डिसेंबर 2008 (17:00 IST)
दहशतवादाच्या मुद्दयाचे राजकारण करण्यावर दिल्लीच्या मुख्यमंत्री शिला दिक्षित यांनी जोरदार प्रहार केला आहे. देशात दहशतवाद रोखण्यात कॉंग्रेसला अपयश आल्याचे सांगून प्रमुख विरोधी पक्ष भाजपने निवडणूक आखाड्यात कॉंग्रेसवर टिकास्त्र सोडले होते.

दहशतवादी हल्ला हा देशावरील हल्ला असून त्यास त्याप्रमाणेच हाताळायला पाहिजे. येत्या ५ वर्षात कॉंग्रेसचे सरकार ‍जीवनमान सुधारण्यासाठी विकासकामांवर लक्ष केंद्रीत करणार आहे. सरकारसमोर काही आव्हानेही आहेत, असे त्या म्हणाल्या.

देशात २००९ मध्ये होणार्‍या सार्वत्रिक निवडणूकीअगोदर ५ राज्यात विधानसभा निवडणूका झाल्या असून कॉंग्रेस आणि भाजप यांच्यातच खरी लढत रंगणार आहे.

वेबदुनिया वर वाचा