कथा पाठविण्याचे आवाहन

वेबदुनिया

सोमवार, 14 एप्रिल 2008 (17:11 IST)
पुण्याच्या अनुराग प्रकाशनातर्फे अनुपुष्प या दिवाळी अंकासाठी दरवर्षीप्रमाणेच या वर्षीही बाल कथा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यात विज्ञान कथा, बोध कथा, कल्पनिक कथा, विनोदी कथा, ग्रामीण कथा, ऐतिहासिक कथा असे विभाग आहेत. कथेसाठी पंधराशे शब्दांची मर्यादा असून लेखकाने कथेची स्व हस्ताक्षरातील झेरॉक्स प्रत खालील पत्त्यावर प्रवेश शुल्कासह पाठवावी. प्रवेश शुल्क २५ रूपये आहे. त्याचा फक्त डी. डी. स्वीकारला जाईल. हा डी. डी. अनुराग प्रकाशन या नावाने काढावा. स्पर्धेतील कथा कुठेही प्रकाशित झालेली नसावी. कथा पाठविण्याची अंतिम तारीख वीस एप्रिल २००८ आहे. उत्कृष्ठ कथा लेखकांना सन्मानित करण्यात येणार आहे.

कथा पाठविण्याचा पत्ता- अनुराग प्रकाशन, पुणे (महाराष्ट्र)
संपादक, अनुपुष्प दिवाळी अंक स. न. /१६५, नवभूमी चौक, पौड रो
शास्त्रीनगर, कोथरूड पुणे-३८ (मारूती मंदिराच्या मागे- दूरध्वनी- ९३२५२९२५२५)

वेबदुनिया वर वाचा