ग्रहणकाळात काय कराल?

एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूने लागणारे सुतक सूर्यग्रहणाच्या काळातही असते. सूतक काळात खाणे- पिणे तसेच संभोग वर्ज्य करावा. ग्रहण काळात झोप टाळावी. लघुशंका तसेच प्रात:र्विधी शक्यतो करू नये.

या काळात खाणेही टाळावे. अबालवृध्द व आजारी व्यक्तीला झोपूही देऊ नये. सुतक काळात शिजवलेले अन्न, कापून ठेवलेली भाजी किंवा फळ दुषित होत असते. ते खाऊ नये. मात्र, तयार झालेलेल्या जेवणात तूप, तेल, दूध, दही, लस्सी, लोणी, पनीर, लोणचे, चटणी यात तीळ ठेवल्याने पदार्थ दूषित होत नाहीत. सुकलेल्या पदार्थांमध्ये तीळ ठेवण्‍याची आवश्यकता नसते.

ग्रहण काळात कोणत्याही मंत्राचा जप फलदायी असतो. महामृत्युंजय मंत्र जपामध्ये सर्व प्रकारचे दु:ख, अडचणी दूर करण्याची ताकद आहे. गर्भवती महिलांनी ग्रहण काळात घराबाहेर निघू नये. कोणती भाजी कापू नये. ग्रहण काळात गर्भधारणा झाली तर जन्माला येणारे बालकात अनेक प्रकारचे व्यंग येतात.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती