नागपुरात दिसणार ६१ टक्के सूर्यग्रहण

वेबदुनिया

गुरूवार, 14 जानेवारी 2010 (18:21 IST)
शुक्रवारी, १५ जानेवारीस खंडग्रास सूर्यग्रहण असून, नागपुरात ते ६१ टक्के दिसणार आहे. यासाठी रमण विज्ञान केंद्रात विशेष सुविधा करण्यात आली आहे.

सकाळी ११.३९ वाजता ग्रहणाला सुरुवात होणार असली तरी नागपुरात ग्रहणाची सुरुवात ११.४० वाजता होणार आहे. दुपारी ३.१७ मिनिटांनी ग्रहण सुटेल. उघड्या डोळ्यांनी ग्रहण पाहणे डोळ्यांसाठी घातक असल्याने 'सोलर फिल्टर एलिक्लिप्स' या उपकरणाच्या सहाय्यानेच ग्रहण पाहावे, असे आवाहन रमण विज्ञान केंद्राचे चारूदत्त पुल्लीवार यांनी केले आहे. या ग्रहणाची सुरुवात आफ्रिकेतून होणार असून, ग्रहणाचा शेवट ईशान्य दिशेने होणार आहे.

वेबदुनिया वर वाचा