Dussehra Muhurat 2022 विजयादशमी पूजा 2022 मुहूर्त आणि पूजन विधी

मंगळवार, 4 ऑक्टोबर 2022 (15:17 IST)
दसर्‍याची खरेदी, सरस्वती पूजन, शस्त्र पूजन, देवी पूजा, शमी पूजा, श्रीराम पूजा यांचे शुभ मुहूर्त-
 
अबूझ मुहूर्त : दसरा साडे तीन मुहूर्तांपैकी एक असल्यामुळे हा संपूर्ण दिवस शुभ मानला गेला आहे.
अमृत काल मुहूर्त : सकाळी 11:33 ते दुपारी 01:02 पर्यंत. या मुहूर्तात सरस्वती पूजन करणे शुभ ठरेल.
अमृत काल मुहूर्त शमी पूजन आणि खरेदीसाठी देखील उपयुक्त आहे.
दुपारचा मुहूर्त : दुपारी 01:20:11 ते 03:41:37 पर्यंत शुभ मुहूर्त. या दरम्यान आपण शमी पूजा, श्रीराम पूजा, देवी पूजा, हवन करु शकता.
गोरज मुहूर्त : संध्याकाळी 06:12 ते 06:36 पर्यंत. या मुहूर्तात श्रीराम आणि देवी ची आरती करता येईल.
विजय मुहूर्त : दुपारी 02:26 ते 03:13 पर्यंत. या मुहूर्तात शस्त्र पूजन करावे.
रवियोग : सकाळी 06:30 ते रात्री 09:15 पर्यंत, सुकर्मा योग सकाळी 08:21 पर्यंत, नंतर धृतियोग पूर्ण दिवस आणि रात्र.
रावण दहन कधी करावे : रावण दहन रात्री करण्याची परंपरा आहे. यासाठी रात्रीचा चौघडिया बघू शकता.
 
दसरा पूजा विधी
दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर सरस्वती पूजन, वाहन पूजन, शस्त्र पूजन, दुर्गा देवी पूजन, देवी अपराजिता पूजन आणि शमी वृक्षाची पूजा केली जाते. प्रत्येक घरात पूजेची परंपरा वेगळी असली तरी पूजा दुपारी केली जाते.
 
2. दसऱ्याच्या दिवशी घरातून रावण दहन पाहण्यासाठी जाताना नवीन किंवा स्वच्छ कपडे घालून तिलक लावून रावण दहनाचा आनंद घ्यावा.
 
3. रावण दहन पाहून परत येताना शमीची पाने घेऊन यावे आणि लोकांना सोने या रुपात देत दसऱ्याच्या शुभेच्छा द्यावा.
 
4. रावण दहन करुन येणार्‍या सदस्यांचे स्त्रिया स्वागत करतात. त्यांना दारावर ओवाळण्याची पद्धत असते. अनेक ठिकाणी घरात रावण तयार करुन त्याचा वध देखील केला जातो.
 
5. रावण दहनानंतर लोक एकमेकांच्या घरी जातात, लहानांना आशीर्वाद देतात, बरोबरीच्या लोकांना मिठी मारतात, मोठ्यांच्या चरणांना स्पर्श करतात आणि त्यांचे आशीर्वाद घेतात.
 
६. या दिवशी मुलांना 'दशहरी' देण्याचीही प्रथा आहे. लहान मुले वडीलधार्‍यांच्या पायाला स्पर्श करतात तेव्हा त्या मुलांना पैसे, कपडे किंवा मिठाई देतात.
 
7. या दिवशी विशेषतः गिलकीचे भजे करण्याची देखील परंपरा आहे.
 
8. देवीचा आशीर्वाद मिळविण्यासाठी या दिवशी दुर्गा सप्तशती किंवा चंडीचे पठण केले जाते.
 
9. दसऱ्याच्या दिवशी पिंपळ, शमी आणि वटवृक्षाखाली तसेच घर आणि मंदिरात दिवा लावण्याची परंपरा आहे. यामुळे घरात सुख-समृद्धी नांदते.
 
10. या दिवशी आपल्यातील वाईटपणा सोडण्याचा संकल्प करण्याची परंपरा आहे.
 
11. या दिवशी सर्व तक्रारी दूर करून प्रियजनांशी प्रेमाने बोलून त्यांच्याशी नाते पुन्हा प्रस्थापित करण्याची परंपरा आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती