घटक - आवळा, आलं, पाणी आणि साखर. कृती - आवळा व आलं किसून रस पिळून काढावा. १ वाटीच्या मिश्रणास दोन वाटी साखर आणि एक वाटी पाणी घ्यावं. पाणी व साखर एकत्र उकळून घ्यावं. उकळी येऊन फेस शांत झाला आणि मिश्रण स्वच्छ दिसू लागलं की गॅस बंद करावा. त्यात तयार केलेलं मिश्रण टाकून ते चांगलं ढवळावं. सरबताचं हे सिरप गाळून कोरड्या बरणीत भरून ठेवावं. आवडत असल्यास त्यात खाण्याचा हिरवा रंग टाकला तरी चालेल. उपयोग - पित्तशामक, तृष्णा शमविणारं, मळमळ, तोंडाला चव नसणं, थकवा येणं या तक्रारीत उपयोगी.