कृती-
सर्वात आधी जांभूळ स्वच्छ धुवून घ्या. आता त्यामधील बिया काढून टाका आणि लगदा वेगळा करा.आता मिक्सर जारमध्ये लगदा, पुदिन्याची पाने, काळे मीठ आणि बर्फाचे तुकडे घाला व जाड पेस्ट तयार करा. आता काळे मीठ आणि मिरची पावडर मिसळा आणि एका प्लेटमध्ये पसरवा. नंतर ग्लास उलटा करा आणि कडांवर मीठ आणि तिखट लावा. ग्लासात लेप तयार होईल. काचेच्या कडांवर लिंबू लावा. आता त्यात जांभळाचा शॉट्स घाला. तर चला तयार आहे आपला आरोग्यवर्धक जांभळाचा शॉट्स, नक्कीच सर्व्ह करा.