होळी स्पेशल थंडाई

गुरूवार, 2 मार्च 2023 (23:17 IST)
साहित्य : पंचवीस ते तीस बदाम-बी, दोन चमचे खसखस, आठ दहा पिस्ते, दोन-तीन चमचे काकडीचे बी, चार चमचे चारोळी, दोन चमचे बडीशोप, सात-आठ वेलदोडे, दहा-बारा दाणे पांढरी मिरी, थोडे बेदाणे, दोन ग्लास दूध, दोन ग्लास पाणी, पाच-सहा गुलाबकळ्या किंवा गुलाबाचे पाणी, साखर.
 
कृती : बादाम भिजत घालून, त्यांची साल काढून टाकावी. पांढरी मिरी नसल्यास काळ्या मिर्‍यांना पाणी लावून, हाताने चोळून त्यांची साल काढावी. नंतर बदामाचा गर, मिरी, वेलदोडे, खसखस, पिस्ते, काकडीचे बी, चारोळी, बडीशोप, बेदाणे हे सर्व जिन्नस एकत्र करून बारीक वाटावे. वाटून झाल्यावर तो गोळा व दूध व पाणी एकत्र करावे व गोड पाहिजे असेल त्या प्रमाणात साखर घालून चांगले ढवळावे.
 
साखर विरघळल्यावर त्याच गुलाबाचे पाणी घालावे. जास्त दाट वाटल्यास दूध किंवा पाणी जरूर असेल, ते घालावे. हवा असल्यास थोडा बर्फ घालून थंडाई पिण्यास द्यावी.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती