बीट सरप्राइज

साहित्य : एक कप बीटरूटचा रस, एक कप गाजराचा रस, अर्धा कप संत्र्याचा रस, अर्धा कप टोमॅटोचा रस, एक कप गोड लिंबू पाणी, मीठ, काळे मिरे पूड, 2-4 पुदिन्याची पानं, अर्धा कप आयसिंग शुगर व थंडा सोडा.

कृती : धुतलेल्या ग्लासांना उलटे करून लिंबाच्या रसात बुडवावे. ग्लासचे कोपरे ओले झाल्यावर डिशमध्ये आयसिंग शुगर पसरवावे आणि कोपऱ्यांना त्यात बुडवावे, या ग्लासांना वेगळे ठेवावे, आता ग्लासमध्ये क्रमवार बीटरूट रस, संत्र्याचा ज्यूस, गाजर व टोमॅटोचा ज्यूस आणि नंतर लिंबू पाणी घालावे. मीठ व काळेमिरे पूड टाकावी. सर्व्ह करण्याअगोदर सोड्याने ग्लासभरून त्यात कुटलेला बर्फ घालावा. पुदिन्याच्या पानांनी सजवून सर्व्ह करावे.

वेबदुनिया वर वाचा