साहित्य -
100 ग्रॅम बदाम,100 ग्रॅम पिस्ता,एक लीटर दूध,अर्धा लीटर पाणी, 500 ग्रॅम साखर,20 दाणे काळीमिरी,केसर,गुलाब पाणी,5 -6 गुलाबाच्या पाकळ्या, वेलचीदाणे.
कृती -
बदाम आणि पिस्ता 5-6 तास थंड पाण्यात भिजवून ठेवा. गुलाबाच्या पाकळ्या,काळीमिरी,आणि वेलचीदाणे वेगवेगळे भिजवून ठेवा. बदाम पिस्त्याचे साल काढून द्या आणि वाटून घ्या.काळीमिरी, गुलाबाच्या पाकळ्या आणि वेलची देखील वाटून घ्या.
दूध,पाणी आणि साखरच्या मिश्रणात सर्व वाटलेले साहित्य मिसळा आणि हे मिश्रण घालून मिश्रण स्वच्छ कापडाने गाळून घ्या.जेणे करून सर्व साहित्य गाळले जाईल.दुधाचे मिश्रण दोन ते तीन वेळा गाळून घ्या. गुलाबपाण्यात केसर घोळून घ्या. आणि गाळलेल्या थंडाईमध्ये मिसळा. आणि थंडाई चांगल्या प्रकारे फेणून घ्या. थंड करा आणि सर्व्ह करा