Bhai Dooj Sweet भाऊबीजेला भावासाठी बनवा स्पेशल मिठाई

मंगळवार, 7 नोव्हेंबर 2023 (22:20 IST)
भाऊबीजचा सण खास भाऊ-बहिणीसाठी असतो. हा सण भाऊ-बहिणीतील सुंदर नातं अधिक घट्ट करतो.या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या कपाळी कुंकवाचा टिळा लावतात आणि त्याच्या दीर्घायुष्याची कामना करतात. हा सण दिवाळीनंतर येतो.या दिवशी बहिणी भावाला पाटावर बसवून त्याच औक्षण करतात आणि त्याच्यासाठी मिठाई आणतात.
 
या सणाला आपण घरी मिठाई बनवून भावाला खुश करू शकता. घरी मिठाई बनवण्याचा विचार करत असाल तर नारळ बर्फी आणि सफरचंदाची खीर बनवून या सणाचा आनंद घ्या. चला तर मग साहित्य आणि कृती जाणून घेऊ या. 
 
नारळ बर्फी बनवण्यासाठी साहित्य
 
किसलेलं नारळ - 2 वाट्या 
पिठी साखर  - 1 वाटी
वेलची पावडर- 1/2 टीस्पून
दूध - 1 लिटर
तूप - 4 चमचे
सुकेमेवे बारीक चिरलेले 
 
कृती :
 
नारळाची बर्फी बनवण्यासाठी सर्वप्रथम कढई घेऊन त्यात तूप गरम करा. तूप गरम झाल्यावर त्यात खोबरे घालून परतून घ्या. ते चांगले भाजल्यावर त्यात दूध, वेलची पूड आणि साखर घालून चांगले शिजवावे.
ते शिजवताना हे लक्षात ठेवा की ते जास्त घट्ट किंवा खूप पातळ नसावे. आता हे पीठ एका ताटात  काढा. काही काळ असेच राहू द्या. ते थंड झाल्यावर तुमच्या आवडत्या आकारात कापून घ्या. ते सजवण्यासाठी, आपण वर सुकेमेवे  किसलेले खोबरे घालू शकता. 
 
 
सफरचंद रबडी 
 साहित्य
 
सफरचंद पल्प - 2 वाट्या
साखर - 1 वाटी 
 दूध - 1 लिटर
तूप - 2 चमचे
वेलची पावडर- 1 टीस्पून
 
कृती : 
सफरचंद रबडी  बनवण्यासाठी प्रथम नॉन-स्टिक पॅन घ्या. या कढईत थोडं तूप गरम करून त्यात दूध घाला. हे दूध घट्ट होईपर्यंत शिजवा. दूध घट्ट झाल्यावर त्यात किसलेले सफरचंद घाला.
 
 सफरचंद लगेच किसून घ्या, नाहीतर ते पिवळे होईल. दुधात सफरचंद टाकल्यानंतर त्यात साखर आणि वेलची पावडर घाला. आता या सर्व गोष्टींना थोडा वेळ शिजू द्या. ते सजवण्यासाठी, सर्व्ह करताना तुम्ही त्यावर सफरचंदाचा तुकडा ठेवू शकता.सफरचंद रबडी खाण्यासाठी तयार.











Edited by - Priya Dixit  
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती