दिवाळी विशेष रेसिपी : घरच्या घरी बनवा चविष्ट कोकोनट रोल

शनिवार, 30 ऑक्टोबर 2021 (16:29 IST)
दिवाळीच्या दिवशी लोक विविध मिठाई देऊन पाहुण्यांचे स्वागत करतात. यंदाच्या दिवाळी आपण कोकोनट रोल बनवून दिवाळीच्या सणाचा आनंद घेऊ शकता. ही रेसीपी बनवायला खूप सोपी आहे.  आपण घरीच कोकोनट रोल रेसिपी बनवू शकता. चला तर मग जाणून घेऊ या साहित्य आणि कृती.
 
साहित्य- 
 
1 वाटी सुक्या खोबऱ्याचा किस, 1/2 वाटी मिल्क पावडर, गरजेपुरते उकळवून थंड केलेले दूध,  1/2 वाटी बारीक साखर, 1/3 वेलची पूड, चिमूटभर खायचा लालरंग.
 
कृती- 
सर्वप्रथम कोकोनट रोल बनविण्यासाठी  सुक्या खोबऱ्याच्या किस मध्ये मिल्क पावडर, बारीक साखर, वेलची पूड घालून चांगल्याप्रकारे मिसळून घ्या. 
आता हे मिश्रण दोन समान भागात वाटून घ्या आणि एका भागात खायचा लाल रंग आणि गरजेपुरते थोडं दूध घालून मिसळा आणि कणकेप्रमाणे मळून घ्या. आता हा गोळा मऊसर करून घ्या.
आता एक प्लास्टिक कागद घेऊन त्यावर हा  गोळा ठेऊन त्याला हाताने सपाट करा त्यावर लाल रंगाच्या दुसरा गोळा ठेवा आणि वरून पिशवी किंवा प्लास्टिकचा कागद ठेऊन गोल  पोळी प्रमाणे लाटून घ्या. आता या लाटलेल्या पोळीचे रोल करा आणि हे रोल फ्रिजमध्ये सेट होण्यासाठी 2 तास ठेवा. नंतर फ्रिजमधून काढून 1 इंचाच्या गोलाकारात कापून घ्या. कोकोनट रोल खाण्यासाठी तयार आहे. 
 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती