Diwali Recipe : रवा बेसन बर्फी

गुरूवार, 13 ऑक्टोबर 2022 (21:31 IST)
साहित्य: 2 वाटी रवा (बारीक असल्यास उत्तम),1 वाटी बेसन,1 वाटी तूप,2 वाटी साखर,पाणी,वेलचीपूड,बदाम काजूचे पातळ काप.
 
कृती:
सर्वप्रथम रवा मध्यम आचेवर तूप न घालता गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घ्यावा. नंतर भाजलेला रवा एका परातीत काढून ठेवा. मग त्याच कढईत तूप घालून, मध्यम आचेवर बेसन खमंग भाजून घ्यावे. 
 
आता एका पातेल्यात सारख विरघळेल एवढे पाणी घाला आणि दोन तारी पाक करा. तयार पाक रवा आणि बेसनाच्या मिश्रणात घालून चांगल्याप्रकारे ढवळावे आणि झाकून ठेवावे. 15-20 मिनीटांनी मिश्रण परत ढवळावे. वेलचीपूड व बदाम काप घालावे. आता एका ताटाला तूप लावून सर्व मिश्रण त्यात घालावे आणि त्याचे आवडत्या आकाराचे काप करावे. तर नक्की या दिवाळीत रवा, बेसन बर्फी ट्राय करा.  

Edited by : Smita Joshi

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती