Crispy Easy Poha Chakli क्रिस्पी पोहा चकली

मंगळवार, 11 ऑक्टोबर 2022 (14:24 IST)
साहित्य: 1 किलो जाड पोहे, आले-लसूण-हिरवी मिरच्यांची पेस्ट, मीठ, पाणी. 
 
कृती : सर्वप्रथम पोहे पाण्याने भिजवून चाळणीत निथळत ठेवावेत. पाणी पूर्णपणे निथळले की, त्या पोह्यांमध्ये आले-लसूण-हिरवी मिरच्यांची पेस्ट आणि मीठ घालून चांगले मळून घ्यावे. मिश्रण जाडसर असल्यास त्याला मिक्सरमधून काढून घ्यावे. हवे असल्यास किंचित पाणी टाकावे. एकदम पातळ होणार नाही याची काळजी घ्यावी. लगेच याच्या चकल्या पाडाव्यात. या चकल्या चांगल्या सुकू द्याव्यात. नंतर त्या तळून खाव्यात. या चकल्या तुम्ही दिवाळीच्या फराळात एक वेगळी चव म्हणून देखील करू शकता. 

Edited by : Smita Joshi

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती