दिवाळीच्या दिवशी दरापुढे सडा ताईच्या रांगोळीने येणार्याची तर्हा एक पाय लांबवर दुसरा पायरीवर ताईची, तिच्या मैत्रिणीची मदार रांगोळीवर छोटे छोटे ठिपके, छोटे छोटे बिंदू कधि रेघांनी जुळतात, ताईच्या मनांत रेंगाळतात-गालीच्याचा आकार रांगोळी साकार कुठे त्रिकोण कुठे चोकोन, कुठे सरळ तर कुठे वाकलेली-सगळे रांगांनी सजलेले जादुचा गालीचा लागला हसायला अन् ताईला काहीतरी पुसू लागला.