सिमीचे नवे रूप इंडियन मुजाहिद्दीन

देशाच्या राजधानीत झालेल्या स्फोटांची जबाबदारी इंडियन मुजाहीद्दीनने घेतली असून इंडियन मुजाहीद्दीन हे सिमीचेच बदललेले रूप असल्याची माहिती आता उघड झाली आहे.


अहमदाबादमध्ये झालेल्या स्फोटांमध्येही याच संघटनेचा हात असून या संघटनेने यापूर्वी वेळोवेळी स्फोट केल्यानंतर जबाबदारी स्वीकारली आहे

गुजरात पोलिसांनी केलेल्या तपासात सिमीचे हे बदललेले स्वरूप असल्याची माहिती समोर आल्यानंतर अहमदाबाद पोलिसांनी वेगाने चक्रे फिरवत या संघटनेची पाळेमुळे शोधून काढली आहेत.


सिमीने आपल्या इंग्रजीतील simi या नावातील पहिले आणि शेवटचे अक्षर वगळत केवळ आयएम हे नाव बाळगले असून त्यातूनच सिमीने आले नवे नाव इंडियन मुजाहीद्दीन धारण केले असल्याची माहिती गुजरातचे पोलिस महासंचालक पी सी पांडे यांनी दिली.

वेबदुनिया वर वाचा