मनोज तिवारी यांचा दिल्ली विजयाचा दावा

सोमवार, 10 फेब्रुवारी 2020 (11:17 IST)
दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्ष विजी होईल, असा अंदाज सर्वच एक्झिट पोलने व्यक्त केला आहे. मात्र, भाजपचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांनी भाजपच्या विजाचा दावा केला आहे. मतदानाच्या अखेरच्या तीन तासात झालेल्या मतदानामुळे भाजप विजयी होणार असल्याचे त्यांनी गणित मांडले आहे. 
 
दिल्ली विधानसभा निवडणुकीत अखेरच दोन तासामध्ये 17 टक्के मतदान झाले असल्याचे तिवारी यांनी सांगितले. ईव्हीएम मतदानाची आकडेवारी ही दुपारी तीन वाजेपर्यंतची आहे. एक्झिट पोल करणार्‍या संस्थांनीदेखील ही आकडेवारी तीन वाजेपर्यंतची असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, दुपारी तीन ते सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत भाजपला अनुकूल मतदान झाले असल्याचा दावा तिवारी यांनी केला आहे. तर, आम आदमी पक्षानेदेखील दुपारी तीननंतर झालेले मतदान आपल्याच बाजूने झाल्याचा दावा केला आहे.
 
भाजप नेते बी. एल. संतोष यांनीदेखील ट्विट करून एक्झिट पोलच्या अंदाजावर प्रश्न उपस्थित केले आहेत. अखेरच्या काही तासांत झालेले मतदान, ईव्हीए मशीनबाबत संशय निर्माण होईल, असे आपकडून होणारा प्रचार याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती