Dhanteras 2023 सनातन धर्मात धनत्रयोदशीच्या सणाकडे सुखाचा आणि समृद्धीचा सण म्हणून पाहिले जाते. या दिवशी धनाची देवता म्हटल्या जाणार्या कुबेराची पूजा केली जाते. याशिवाय या दिवशी लोक सुख-समृद्धीसाठी मौल्यवान धातूची नाणी, नवीन भांडी, दागिने आणि कपडे खरेदी करतात. यावर्षी 10 नोव्हेंबर 2023 शुक्रवार रोजी धनतेसर सण साजरा केला जाणार आहे. ज्योतिषांच्या मते या दिवशी नवीन वस्तू खरेदी करणे शुभ असते, परंतु या व्यतिरिक्त धनत्रयोदशीला सरड्यासह 5 गोष्टी पाहणे देखील खूप शुभ असते. असे मानले जाते की हे माता लक्ष्मीच्या आगमनाचे संकेत देते. असे मानले जाते की धनत्रयोदशीच्या दिवशी काही गोष्टी पाहणे खूप शुभ असते.