दिवाळी पूजा विधी संपूर्ण मराठीत Lakshmi Pujan 2022 Pujan Vidhi
रविवार, 23 ऑक्टोबर 2022 (11:07 IST)
पूजेचे साहित्य
दोन ताम्रकलश (एक पूजेसाठी पाणी ठेवण्याचा आणि दुसरा लक्ष्मी पूजनासाठी पाण्याने अर्धा भरलेला), केळीचे पान, पाट, आसने, लक्ष्मीची मूर्ती, तीन तबके किंवा ताम्हण (एक कलशावर ठेवण्यासाठी, एक फुले ठेवण्यासाठी, एक आचमन कार्यासाठी), पूजेचे साहित्य ठेवण्यासाठी मोठे ताट, भांड- पळी, समई, निरांजन, धूपारती, कापूरारती, समई, तेलवात, तूप, फुलवात, उदबत्ती, शंख, घंटा, पंचामृत, कुंकवाचा करंडा, रांगोळी, रंग, अत्तर, नैवेद्यासाठी मोठी पात्रे, दोन किलो तांदूळ, शुद्ध पाणी, गंध, अक्षता, अबीर, सिंदूर, काड्यांची पेटी, हळदी- कुंकू, धणे, गूळ-खोबरे, साखर- फुटाणे, साळीच्या लाह्या, बत्तासे, पेढे, गुलाबपाणी, विड्याची 10 पाने, 10 सुपार्या, 2 नारळ, एक उपरणे, एक खण, गणपतीसाठी कापसाची दोन वस्त्रे, दक्षिणा, सुटी नाणी, दागिने, सोने नाणे, रत्ने, चांदीची नाणी, हिशेबाच्या नवीन संवत्सरांच्या वह्या, दौत, टाक, लेखणी, तराजू, वजनेमापे, दूर्वा, विविध प्रकारची फुले, फुलांच्या माळा, तोरण, पताका, दिव्यांची रोषणाई, पान- सुपारी, आंब्याचे डहाळे, निर्माल्यासाठी परडी, देवीला रात्री निद्रेसाठी एक लहान पाट.
पूजास्थान स्वच्छ करावे. आरस करुन जागा सुशोभित करावी. 'लक्ष्मी' च्या रुपात नाणी, सोन्या- चांदीचे दागिने, भांडी, पैसे यांची व्यवस्था असावी. लक्ष्मी पूजनासाठी घेतलेली नाणी वर्षभर तशीच जपून ठेवावी त्यात वाढ करत राहावी. सरस्वती पूजनासाठी चोपड्याच्या पहिल्या पृष्ठावर स्वस्तिक आखून संवत्सर, तिथी, महिना यांचा उल्लेख करावा. ॥शुभ॥ ॥लाभ॥ लिहावे. सोबत लेखणी, आणि आपल्या व्यवसायाप्रमाणे सामान ठेवावे.
पाटावर तांदूळ पसरून त्यावर कलश ठेवावे. कलशात नाणी, फुले असावी आणि त्यावर आंब्याचा टहाळा आणि त्यावर तबक असावे. तबकात तांदूळ, तांदळावर कुंकवाने स्वस्तिक, त्यावर लक्ष्मी देवीची मुर्ती तसेच तबकात एक नारळ ठेवावे. पाटाच्या बाजूस अक्षता ठेवून त्यावर गणपती प्रतीक एक सुपारी ठेवावी. कलशासमोर जमाखर्चाच्या वह्या ठेवाव्यात.
पूजा करणार्याने स्नान करून स्वच्छ आणि नवीन वस्त्र नेसावे. कपाळावर तिलक लावावा. घरातील देवांना व वडील मंडळींना नमस्कार करावा. पाटावर आसन घालून बसावे. पूजकाने डाव्या हातास पाण्याचा तांब्या, समोर ताम्हन, पळीभांडे ठेवावे. देवाजवळ समई, उदबत्ती, निरांजन लावावी. आचमन करत पूजेस प्रारंभ करावा.
आचमन प्राणायाम
दोनदा आचमन
कलशातील पाणी भांड्यात घ्यावे. पाणी एकेक पळी उजव्या तळहातावर घेत पहिल्या तीन नामांनी ते प्राशन करावे.
ॐ गोविंदाय नमः ।
म्हणताना एक पळी पाणी उजव्या हातावरून ताम्हनात सोडावे. असे दोनदा करून मग
ॐ विष्णवे नमः । ते ॐ श्रीकृष्णाय नमः ।
ही नावे हात जोडून म्हणावी.
ॐ केशवाय नमः ।
ॐ नारायणाय नमः ।
ॐ माधवाय नमः ।
ॐ गोविंदाय नमः ।
ॐ विष्णवे नमः ।
ॐ मधुसूदनाय नमः ।
ॐ त्रिविक्रमाय नमः ।
ॐ वामनाय नमः ।
ॐ श्रीधराय नमः ।
ॐ ह्रषीकेशाय नमः ।
ॐ पद्मनाभाय नमः ।
ॐ दामोदराय नमः ।
ॐ संकर्षणाय नमः ।
ॐ वासुदेवाय नमः ।
ॐ प्रद्युम्नाय नमः ।
ॐ अनिरुद्धाय नमः ।
ॐ पुरुषोत्तमाय नमः ।
ॐ अधोक्षजाय नमः ।
ॐ नारसिंहाय नमः ।
ॐ अच्युताय नमः ।
ॐ जनार्दनाय नमः ।
ॐ उपेन्द्राय नमः ।
ॐ हरये नमः ।
ॐ श्रीकृष्णाय नमः ।
प्राणायाम -
दोनदा प्राणायाम करावा. प्रथम डाव्या नाकपुडीने श्वास आत घ्यावा, 5 सेकंद कुंभक करून उजव्या नाकपुडीने श्वास सोडावा.
* ॐ प्रणवस्य परब्रह्म ऋषिः । परमात्मा देवता । दैवी गायत्रीच्छंदः ।
सप्तानां व्याह्रतीनां विश्वामित्र, जमदग्नि, भरद्वाज, गौतम, अत्रि, वसिष्ठ, काश्यप ऋषयः ।
अग्नि, वायु, आदित्य, बृहस्पति, वरुण, इन्द्र, विश्वेदेवा देवताः ।
गायत्री, उष्णिक्, अनुष्टब्, बृहती, पंक्ति, त्रिष्टुब्, जगत्यश्छंदासि । गायत्र्या गाथिनो विश्वामित्र ऋषिः ।
सविता देवता । गायत्रीच्छंदः । गायत्रीशिरसः प्रजापतिऋषिः । ब्रह्मा, अग्नि, वायु, आदित्य, देवताः ।
यजुश्छंदः । प्राणायामे विनियोगः । ॐ भूः । ॐ भुवः ।
ॐ स्वः । ॐ महः । ॐ जनः । ॐ तपः । ॐ सत्यम् । ॐ भूर्भुव स्वः ।
ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि । धियो यो नः प्रचोदयात् ।
ॐ आपो ज्योती रसोऽमृतं ब्रह्मभुर्भूवः स्वरोम् ।
देवतांचे वंदन करावे आणि हात जोडून प्रार्थना म्हणावी-
श्रीमन्महागणपतये नमः । इष्टदेवताभ्यो नमः । श्रीसरस्वत्यै नमः ।
श्रीगुरुभ्यो नमः । कुलदेवताभ्यो नमः । ग्रामदेवताभ्यो नमः । स्थानदेवताभ्यो नमः ।
वास्तुदेवताभ्यो नमः । श्रीमहालक्ष्मीमहासरस्वतीभ्या नमः । आदित्यादिनवग्रह- देवताभ्यो नमः ।
सर्वेभ्यो देवेभ्यो नमः । मातापितृभ्याम् नमः ।
सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमोनमः । प्रारब्धकार्यं निर्विघ्नमस्तु ।
प्रार्थना व संकल्प
प्रार्थना
सुमुखश्चैकदंतश्च कपिलो गजकर्णकः ।
लंबोदरश्च विकटो विघ्ननाशो गणाधिपः ॥१॥
धूम्रकेतुर्गणाध्यक्षो भालचंद्रो गजाननः ।
द्वादशैतानि नामानि यः पठेच्छृणुयादपि ॥२॥
विद्यारंभे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा ॥
संग्रामे संकटे चैव विघ्नस्तस्य न जायते ॥३॥
शुक्लांबरधरं देवं शशिवर्णं चतुर्भुजम् ।
प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशांतये ॥४॥
सर्व मंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके ।
शरण्ये त्र्यंबके गौरि नारायणि नमोस्तुऽते ॥५॥
सर्वदा सर्वकार्येषु नास्ति तेषामंगलम् ।
येषां ह्रदिस्थो भगवान् मंगलायतनं हरिः ॥६॥
तदेवं लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चंद्रबलं तदेव ।
विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते तेंऽघ्रियुगं स्मरामि ॥७॥
लाभस्तेषां जयस्तेषां कुतस्तेषां पराजयः ।
येषामिंदीरवश्यामो ह्रदयस्थो जनार्दनः ॥८॥
विनायकं गुरूं भानुं ब्रह्माविष्णुमहेश्वरान् ।
सरस्वतीं प्रणौम्यादौ सर्वकार्यार्थसिद्धये ॥९॥
अभीप्सितार्थसिद्ध्यर्थं पूजितो य सुरासुरैः ।
सर्वविघ्नहरस्तस्मै गणाधिपतये नमः ॥१०॥
सर्वेष्वारब्धकार्येषु त्रयस्त्रिभुवनेश्वराः ।
देवा दिशंतु नः सिद्धिं ब्रह्मेशानजनार्दनाः ॥११॥
देशकालोच्चारण -
तिथिर्विष्णुस्तथा वारो नक्षत्रं विष्णुरेव च । योगश्च करणं चैव सर्वं विष्णुमयं जगत् । अद्य एवंगुणविशेषणविशिष्टायां शुभपुण्यतिथौ -
संकल्प -
हातात अक्षता घेऊन त्या पळीभर पाण्यासह ताम्हनात सोडाव्यात -
मम आत्मनः सकलशास्त्र पुराणोक्तफलप्राप्त्यर्थं - श्रीभगवती लक्ष्मीदेवताप्रीत्यर्थम्, अस्माकं सर्वेषां सकलकुटूंबानां द्विपदचतुष्पदसहितानां क्षेमस्थैर्य, अभय, आयु, आरोग्य,
ऐश्वर्य, अभिवृद्ध्यर्थं समस्तमंगलावाप्त्यर्थं समस्ताभ्युदयार्थं च अप्राप्तलक्ष्म्याः प्राप्त्यर्थं प्राप्तलक्ष्म्याः चिरकालवासार्थं अद्य अश्विनकृष्ण - अमावास्यायां प्रतिवार्षिक -
विहितम्, यथाज्ञानेन यथामिलोतोपचारद्रव्यैः श्रीलक्ष्मी (कुबेर) श्रीसरस्वतीपूजनम् करिष्ये तदंगत्वेन कलशाराधनं आदौ निर्विघ्नतासिद्ध्यर्थं महागणपतिपूजनं, कलशघंटापूजनादि
तथा लेखनी-मषीपात्रादीनां च पूजामहं करिष्ये ।
हातातील पाणी ताम्हनात सोडावे.
आसनशुद्धि -
भूमीला उजव्या हाताने स्पर्श करावा. -
पृथ्वीति मंत्रस्य मेरुपृष्ठ ऋषिः । कूर्मो देवता । सुतलं छंदः । आसने विनियोगः ।
पृथ्वी
ॐ पृथ्वि त्वया धृता लोका देवि त्वं विष्णुना धृता ॥
त्वं च धारय मां देवि पवित्रं कुरु चासनम् ॥
चामुंडा
ऊर्ध्वकेशि विरूपाक्षि मांसशोणितभोजने ।
तिष्ठ देवि शिखाबंधे चामुंडे त्वपराजिते ॥
भूतोत्सारण
अपक्रामन्तु भूतानि पिशाचाः सर्वतो दिशम् ।
सर्वेषामविरोधेन पूजाकर्म समारभे ॥
भैरवप्रार्थना
तीक्ष्णदंष्ट्र महाकाय कल्पांतदहनोपम ।
भैरवाय नमस्तुभ्यमनुज्ञां दातुमर्हसि ॥
षडंगन्यास
सहा ठिकाणी स्पर्श करून न्यास करावा.
ह्रदयास हस्तस्पर्श
श्रीमहालक्ष्म्यै नमः । ह्रदयाय नमः ।
मस्तकाला स्पर्श
श्रीमहालक्ष्म्यै नमः । शिरसे नमः ।
शिखास्थानी हस्तस्पर्श
श्रीमहालक्ष्म्यै नमः । शिखायै वषट् ।
दोन्ही हात जोडून समोर धरून आपल्याकडे वरून बाहेरून आत वळवावे.
श्रीमहालक्ष्म्यै नमः । कवचाय हुम् ।
दोन्ही डोळे व भ्रूमध्य या ठिकाणी उजव्या हाताची अनामिका मध्यमा आणि तर्जनी या तीन बोटांनी स्पर्श करावा व उजवा हात डोक्यावरून मागे न्यावा.
श्रीमहालक्ष्म्यै नमः । नेत्रत्रयाय वौषट् ।
मंत्रानंतर डाव्या हातावर उजव्या हाताचे मधले बोट व अनामिका यांनी टाळी वाजवावी
श्रीमहालक्ष्म्यै नमः । अस्त्राय फट् ।
कलशपूजा -
स्वच्छ पाण्याने भरलेल्या तांब्यावर उजवा हात पालथा ठेवावा. गंध-अक्षता लावलेले फूल चिकटवावे.
कलशस्य मुखे विष्णुः कंठे रुद्रः समाश्रितः ।
मूले तत्र स्थितो ब्रह्मा मध्ये मातृगणाः स्मृताः ॥१॥
कुक्षौ तु सागराः सर्वे सप्तद्वीपा वसुंधरा ।
ऋग्वेदोथ यजुर्वेदः सामवेदोह्यथवर्णः ।
अंगैश्च सहिता सर्वे कलशं तु समाश्रिताः ।
अत्र गायत्रीसावित्री शांतिः पुष्टोकरी तथा ।
आयांतु देवपूजार्थं दुरितक्षयकारकाः ।
गंगे च यमुने चैव गोदावरि सरस्वति ।
नर्मदे सिंधु कावेरि जलेऽस्मिन् सन्निधिं कुरु ।
कलशदेवताभ्यो नमः । सकलपूजार्थे गंधाक्षतपुष्पाणि समर्पयामि ॥
या कलशातील पाणी पूजेसाठी घ्यायचे आहे. कलशाची पुढीलप्रमाणे प्रार्थना करावी-
कलशः कीर्तिमायुष्यं प्रज्ञां मेधां श्रियं बलम् ।
योग्यतां पापहानिं च पुण्यं वृद्धिं च यच्छति ॥
सर्वतीर्थमयो यस्मात्सर्वदेवमयो यतः ।
अतो हरिप्रियोऽसि त्वं पूर्णकुंभ नमोऽस्तुते ॥
शंखपूजा -
शंखाला स्नान घालून, पुसून जागेवर ठेवावे. गंध- फूल वाहावे.
शंखात तीन पळ्या शुद्ध पाणी घालावे. पाण्यात तुलस ठेवावी. शंख देवाच्या उजव्या बाजूस ठेवावा.
ॐ शंखादौ चंद्रदैवत्यं कुक्षौ वरुणदेवता ।
पृष्ठे प्रजापतिश्चैव अग्रे गंगासरस्वती ।
त्रैलोक्ये यानि तीर्थानि वासुदेवस्य चाज्ञया ।
शंखे तिष्ठंति विप्रेन्द्र तस्मात् शंखं प्रपूजयेत् ।
त्वं पुरा सागरोत्पन्नो विष्णुना विधृतः करे ।
नमितः सर्वदेवैश्च पांचजन्य नमोऽस्तु ते ।
ॐ पांचजन्याय विद्महे । पावमानाय धीमहि । तन्नः शंखः प्रचोदयात् ।
शंखदेवताभ्यो नमः । सकलपूजार्थे गंधपुष्पं तुलसीपत्रं च समर्पयामि ।
घंटापूजा -
घंटेला स्नान घालून पुसून ती जागेवर ठेवून हळद- कुंकू, गंध- अक्षता व फूल वाहावे. नंतर घंटा थोडी वाजवावी.-
आगमनार्थं तु दैवानां गमनार्थं तु रक्षसाम् ।
कुर्वे घंटारवं तत्र देवताऽऽहवानलक्षणम्।
घंटायै नमः । सकलपूजार्थे हरिद्राकुंकुमं गंधाक्षतपुष्पं च समर्पयामि
दीपपूजा -
समईला हळद- कुंकू, गंध- फूल व अक्षता वाहून नमस्कार करावा.
भो दीप ब्रह्मरूपस्त्यं ज्योतिषां प्रभुरव्ययः ।
आरोग्यं देहि पुत्रांश्च सर्वार्थाश्च प्रयच्छ मे ॥
यावत्पूजासमाप्तिः स्यात्तावत् त्वं सुस्थिरो भव ।
दीपदेवताभ्यो नमः । सकलपूजार्थे हरिद्राकुंकुमं गंधाक्षतपुष्पंच समर्पयामि । नमस्करोमि ।
मंडपपूजा -
लक्ष्मी पूजनासाठी असलेल्या देव्हार्याची पूजा गंध- फूल वाहून करावी -
उत्तप्तोज्ज्वलकांचनेन रचितं तुङ्गांगरंगस्थलम् ।
शुद्धस्फटिकभित्तिकाविलसितैस्स्तंभैश्च हेमैः शुभैः ॥
मुक्ताजालाविलंबिमंडलयुतं वज्रैश्च सोपानकैः ।
नानारत्नविराजितैश्च कलशैरत्यन्तशोभावहैः ॥१॥
द्वारैश्चामररत्नराजखचितैः शोभावहैर्मण्डितम् ।
रत्नाग्र्यैरपि शंखपद्मधवलप्रभाजितस्वस्तिकैः ॥
माणिक्योज्ज्वलदीपदीप्तिविलसल्लक्ष्मीविलासास्पदम् ।
ध्यायेन्मंडपमर्चनेषु सकलेष्वेवंविधं साधकः ॥२॥
मंडपदेवताभ्यो नमः । सर्वोपचारार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामि ।
पूजा साहित्य प्रोक्षण -
तुलसीदलाने पूजन साहित्यावर व स्वतःवर जल प्रोक्षण करून शुद्धी करावी-
अपवित्रः पवित्रो वा सर्वावस्थां गतोऽपि वा ।
यः स्मरेत् पुंडरीकाक्षं स बाह्याभ्यंतरः शुचिः ।
गणपती पूजन
पाटावर जरा अक्षता पसरून त्यावर गणपतीचे प्रतीक म्हणून सुपारी ठेवावी. त्यावर अक्षता वाहून नमस्कार करावा व ध्यान करावे -
गणानां त्वा शौनको गृत्समदो गणपतिर्जगती । गणापतिपूजने विनियोगः ।
ॐ गणानां त्वा गणपतिं हवामहे कविं कवीनामुपमश्रवस्तमम् ।
ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पत आ नः शृण्वन्नूतिभिः सीदसादनम् ॥
वक्रतुंड महाकाय कोटिसूर्यसमप्रभ ।
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ॥१॥
ॐ भूर्भुवः स्वः । श्रीमहागणपतये नमः । असिमन् पूगीफले महागणपतिं सांगं सपारिवारं सायुधं सशक्तिकं आवाहयामि ।
आवाहन व आसन म्हणून दोन दूर्वा ठेवाव्यात व त्यावर सुपारी ठेवावी.-
श्रीमहागणपतये नमः । आवाहयामि ।
श्रीमहागणपतये नमः । आसनार्थे दूर्वांकुरान् समर्पयामि ।
फूलाने पळीत पाणी घेऊन शिंपडावे.
श्रीमहागणपतये नमः । पादयोः पाद्यं समर्पयामि
पळीभर पाण्यात गंध-अक्षता, फूल घेऊन सुपारीवर वाहावे.
श्रीमहागणपतये नमः । अर्घ्यं समर्पयामि ।
पळीत पाणी घेऊन फुलाने शिंपडावे-
श्रीमहागणपतये नमः । आचमनीयं समर्पयामि ।
पळीत पाणी घेऊन पुन्हा फुलाने शिंपडावे-
श्रीमहागणपतये नमः । स्नानं समर्पयामि ।
पळीभर पाणी घालावे.
श्रीमहागणपतये नमः । वस्त्रं समर्पयामि ।
कापसाची वस्त्रे वाहावीत-
श्रीमहागणपतये नमः । यज्ञोपवीतं समर्पयामि ।
जानवे वाहावे-
श्रीमहागणपतये नमः । विलेपनार्थे चंदनं समर्पयामि ।
चंदनाचे कुंकुममिश्रित गंध फुलाने वाहावे-
श्रीमहागणपतये नमः । अलंकारार्थे अक्षतान् समर्पयामि ।
अक्षता वाहाव्या-
श्रीऋद्धिसिद्धिभ्यां नमः । हरिद्रांकुंकुमं सौभाग्यद्रव्यं समर्पयामि ।
श्रीगणेशांगभूत ऋद्धिसिद्धींची पूजा - हळद- कुंकू सुपारीवर वाहावे-
श्रीमहागणपतये नमः । पूजार्थे पुष्पाणि समर्पयामि ।
फूले वाहावीत-
श्रीमहागणपतये नमः । धूपं समर्पयामि ।
उदबत्ती लावून ती उजव्या हाताने देवाला ओवाळावी. डाव्या हातात घंटा घेऊन घंटानाद करावा-
श्रीमहागणपतये नमः । दीपं समर्पयामि ।
निरांजन लावून उदबत्तीप्रमाणेच ओवाळावे. त्यावेळी घंटानाद करावा-
श्रीमहागणपतये नमः । (नैवेद्याचे नाव घ्यावे) नैवेद्यं समर्पयामि ।
सुपारीसमोर पाटावर पाण्याने लहानसा चौकोन करून त्यावर दूध किंवा इतर जे काही नैवेद्य दाखवायचा असेल तो ठेवावा. त्याभोवती पाणी परिसिंचन करावे व नैवेद्यावर
दूर्वेने किंवा फुलाने पाणी शिंपडावे- हे करताना प्राणाय स्वाहा इत्यादि स्वाहाकार दोनदा म्हणावे. प्रत्येक वेळी देवाला घास भरवीत आहोत अशी क्रिया उजव्या हाताने करावी -
ऋतं त्वा सत्येन परिषिंचामि ।
ॐ प्राणाय स्वाहा । ॐ अपानाय स्वाहा । ॐ व्यानाय स्वाहा ।
ॐ उदानाय स्वाहा । ॐ समानाय स्वाहा । ॐ ब्रह्मणे स्वाहा ।
नैवेद्यमध्ये पानीयं समर्पयामि । पुनर्नैवेद्यं समर्पयामि ।
फुलाने पाणी शिंपडावे-
ॐ प्राणाय स्वाहा । ॐ अपानाय स्वाहा । ॐ व्यानाय स्वाहा ।
ॐ उदानाय स्वाहा । ॐ समानाय स्वाहा । ॐ ब्रह्मणे स्वाहा ।
उत्तरापोशनं समर्पयामि । हस्तप्रक्षालनं समर्पयामि । मुखप्रक्षालनं समर्पयामि ।
एकेक पळी पाणी फुलाने शिंपडत वरीलप्रमाणे क्रमाने म्हणावे-
करोद्वर्तनार्थे चंदनं समर्पयामि ।
गंध फुलाने वाहावे-
श्रीमहागणपतये नमः । मुखवासार्थे पूगीफलतांबूलं समर्पयामि ।
दक्षिणां समर्पयामि ।
विड्याची दोन पाने त्यावर सुपारी व दक्षिणा ठेवून त्यावर पळीभर पाणी सोडावे-
श्रीमहागणपतये नमः । फलार्थे नारिकेलफलं समर्पयामि ।
दूर्वांकुर व पुष्प वाहून नमस्कार करावा. कार्यसिद्धीसाठी प्रार्थना करावी-
श्रीमहाणपतये नमः । दूर्वाकुरान् मंत्रपुष्पं च समर्पयामि । नमस्करोमि ।
कार्यं मे सिद्धिमायातु प्रसन्ने त्वयि धातरि ।
विघ्नानि नाशमायान्तु सर्वाणि सुरनायक ॥
वक्रतुंड महाकाय कोटिसूर्यसमप्रभ ।
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ॥
श्रीमहागणपतये नमः । निर्विघ्नं कुरु ।
अनेन कृतषोडशोपचारपूजनेन श्रीमहागणपतिः प्रीयताम् ।
वरुणस्थापना व पूजा
श्री लक्ष्मी पूजनासाठी कलशाची स्थापना करावयाची असते. प्रथम हात जोडून भूमीची प्रार्थना करावी-
ॐ भूर्भुवःस्वः । पृथिवीं नमस्करोमि ।
ॐ वरुणाय नमः । कलशे शुद्धोदकं क्षिपामि ।
नंतर पसाभर अक्षता केळीच्या पानावर किंवा पाटावर पसरव्या, त्यावर पाण्याने अर्धा भरलेला कलश ठेवावा. कलशाची स्थापना करताना असे म्हणावे-
ॐ वरुणाय नमः । कलशमध्ये वरुणमावाहयामि । गंधपुष्प समर्पयामि ।
कलशाला बाहेरून तीन बोटे उभे गंध लावावे व फूल चिकटवावे-
ॐ वरुणाय नमः । आम्रपल्लवं समर्पयामि ।
कलशावर आंब्याचा टहाळा असाव्या-
ॐ वरुणाय नमः । दूर्वांकुरान् समर्पयामि ।
कलशात दोन दूर्वा घालाव्यात -
ॐ वरुणाय नमः । पूगीफले समर्पयामि ।
कलशात दोन सुपार्या घालाव्या-
ॐ वरुणाय नमः । यथाशक्ति सुवर्णरत्नादि-द्रव्यं समर्पयामि ।
कलशात सोने, चांदीची नाणी, रत्न यथाशक्ती घालावे-
ॐ वरुणाय नमः । पुष्पं तुलसीदलमक्षतान् च समर्पयामि ।
कलशात फूल, तुळशीचे पान व थोड्या अक्षता घालाव्या-
ॐ वरुणाय नमः । पूर्णपात्रं स्थापयामि ।
कलशावर ताम्हन किंवा धातूचे तबक ठेवावे. त्यात पसाभर तांदूळ पसरावे. तांदळांवर कुंकवाने स्वस्तिक काढावे. त्यावर एक नारळ ठेवावा-
वरुणाला आवाहन
ॐ वरुणाय नमः । अस्मिन् कलशे वरुणं सांगं सपरिवारं सायुधं सशक्तिकमावाहयामि ।
कलशाला दोन्ही हात लावावेत-
ॐ वरुणाय नमः । सकलपूजार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामि ।
ताम्हनावरच गंध- अक्षता व फूल अर्पण करावे-
कलश प्रार्थना -
हात जोडून पुढील श्लोक म्हणावेत -
देवदानवसंवादे मथ्यमाने महोदधौ ।
उत्पन्नोऽसि तदा कुंभ विधृतो विष्णुना स्वयम् ॥१॥
त्वत्तोये सर्वतीर्थानि देवाः सर्वे त्वयि स्थिताः ।
त्वयि तिष्ठन्ति भूतानि त्वयि प्राणाः प्रतिष्ठिताः ॥२॥
शिवः स्वयं त्वमेवासि विष्णुस्त्वं च प्रजापतिः ।
आदित्य वसवो रुद्रा विश्वेदेवा सपैतृकाः ॥३॥
त्वयि तिष्ठ्नति सर्वेऽपि यतः कामफलप्रदाः ।
त्वत्प्रसादादिमां पूजां कर्तुमीहे जलोद्भव ॥४॥
सान्निध्यं कुरु मे देव प्रसन्नो भव सर्वदा ॥
ॐ वरुणाय नमः । वरुणं प्रार्थये ।
कलशात वरुणदेवता स्थानापन्न झाली आहे.
श्रीलक्ष्मीसरस्वती पूजा
कलशाजवळच जमा- खर्चाच्या वह्या, लेखणी, दौत, तराजू, वजने इत्यादि ठेवावे. वह्यांचे पहिले पान ज्यावर स्वस्तिक तसेच शुभ लाभ लिहिले असेल ते उघडून ठेवावे
चांदीचे लक्ष्मी छापाचे नाणे, सुवर्णादि धातूचे दागिने, लक्ष्मी व सरस्वती मूर्ती ठेवावी. मूर्ती किंवा नाणे ताम्हनात तांदळावर ठेवावे. दागिने पाटावर वस्त्र घालून त्यावर ठेवावे.
श्रीलक्ष्मीध्यान
या सा पद्मासनस्था विपुलकटितटी पद्मपत्रायताक्षी ॥
गंभीरावर्तनाभिः स्तनभरनमिता शुभ्रवस्त्रोत्तरीया ॥
या लक्ष्मीर्दिव्यरूपैर्मणिगणखचितैः स्नापिता हेमकुंभैः ।
सा नित्यं पद्महस्ता मम वसतु गृहे सर्वमांगल्यमस्तु ॥
नमो दैव्ये महादेव्यै शिवायै सततं नमः ।
नमः प्रकृत्यै भद्रायै नियताः प्रणताः स्म ताम् ॥
या देवी सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थिता ।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ॥
श्रीसरस्वतीध्यान
नमस्ते शारदे देवि काश्मीरपुरवासिनि ।
त्वामहं प्रार्थये नित्यं विद्यादानं च देहि मे ॥
श्रीमहालक्ष्मीसरस्वतीभ्यां नमः । ध्यानं समर्पयामि ।
आवाहन -
देवीवर अक्षता वाहाव्यात-
सर्वलोकस्य जननी शूलहस्तां त्रिलोचनाम् ।
सर्वदेवमयीमीशां देवीमावाहयाम्यहम् ॥
श्रीमहालक्ष्मीसरस्वतीभ्या नमः । आवाहयामि ।
आवाहनार्थे अक्षतान् समर्पयामि ।
आसन -
देवीच्या मूर्तीखाली अक्षता ठेवाव्यात-
तप्तकांचनवर्णाभं मुक्तामणिविराजितम् ।
अमलं कमलं दिव्यामासनं प्रतिगृह्यताम् ॥
श्रीमहालक्ष्मीसरस्वतीभ्यां नमः । आसन समर्पयामि ।
आसनार्थे अक्षतान् समर्पयामि ।
पाद्य -
पळीभर पाणी फुलाने शिंपडावे-
गंगादितीर्थसंभूत गंधपुष्पाक्षतैर्युतम् ।
पाद्यं ददाम्यहं देवि गृहाणाशु नमोऽस्तु ते ॥
श्रीमहालक्ष्मीसरस्वतीभ्यां नमः । पादयोः पाद्यं समर्पयामि ।
अर्घ्य -
पळीभर पाण्यात गंध अक्षता घालून ते फुलाने शिंपडावे-
अष्टगंधसमायुक्तं स्वर्णपात्रप्रपूरितम् ।
अर्घ्यं गृहाण मद्दत्तं महालक्ष्मि नमोऽस्तु ते ॥
श्रीमहालक्ष्मीसरस्वतीभ्यां नमः । अर्घ्यं समर्पयामि ।
आचमन -
फूलाने पाणी शिंपडावे-
सर्वलोकस्य या शक्तिर्ब्रह्मविष्ण्वादिभिः स्तुता ।
ददाम्याचमनं तस्यै महालक्ष्म्यै मनोहरम् ॥
श्रीमहालक्ष्मीसरस्वतीभ्यां नमः । आचमनीय़ं समर्पयामि ।
पंचामृतस्नान -
देवीची मूर्ती ताम्हनात घेउन त्यावर पंचामृतातील दूध, दही, तूप, मध व साखर हे पदार्थ एकेक, पुढीलप्रमाणे वाहावे. प्रत्येक पदार्थानंतर शुद्धोदक अर्पण करावे. तसबीर
असल्यास पंचामृताचे पदार्थ फुलाने किंचित् शिंपडावे व शुद्धोदक उजव्या हाताने ताम्हनात सोडावे-
पंचामृतसमायुक्तं जान्हविसलिलं शुभम् ।
गृहाण विश्वजननि स्नानार्थं भक्तवत्सले ॥
पयो दधि घृत चैव मधुशर्करया युतम् ।
पंचामृतेन स्नपनं क्रियतां परमेश्वरि ॥
श्रीमहालक्ष्मीसरस्वतीभ्यां नमः ।
या मंत्राने पुढील क्रमाने एकैकशः पंचामृत व जल अर्पण करावे-
श्रीमहालक्ष्मीसरस्वती पयःस्नानं समर्पयामि । शुद्धोदकस्नानं समर्पयामि ।
श्रीमहालक्ष्मीसरस्वती दधिस्नानं समर्पयामि । शुद्धोदकस्नानं समर्पयामि ।
श्रीमहालक्ष्मीसरस्वती घृतस्नानं समर्पयामि । शुद्धोदकस्नानं समर्पयामि ।
श्रीमहालक्ष्मीसरस्वती मधुस्नानं समर्पयामि । शुद्धोदकस्नानं समर्पयामि ।
श्रीमहालक्ष्मीसरस्वती शर्करास्नानं समर्पयामि । शुद्धोदकस्नानं समर्पयामि ।
श्रीमहालक्ष्मीसरस्वती गंधोदकस्नानं समर्पयामि ।
श्रीमहालक्ष्मीसरस्वती शुद्धोदकस्नानं समर्पयामि ।
अत्तर फुलाने लावावे - श्रीमहालक्ष्मीसरस्वती मांगलिकस्नानं समर्पयामि ।
पाणी गरम करून ते वाहावे- श्रीमहालक्ष्मीसरस्वती उष्णोदकदकस्नानं समर्पयामि ।
गंधफूल वाहावे- श्रीमहालक्ष्मीसरस्वती सकलपूजार्थे गंधपुष्पं समर्पयामि ।
पूर्वपूजा
पूर्वपूजा पंचोपचार
देवीची मूर्ती पुसावी. ताम्हनातील पाणी तीर्थपात्रात काढून ठेवावे-
गंध लावावे -
श्रीमहालक्ष्मीसरस्वती विलेपनार्थे चंदनं समर्पयामि ।
फूल वाहावे-
श्रीमहालक्ष्मीसरस्वती पूजार्थे पुष्पं समर्पयामि ।
धूप किंवा उदबत्ती, घंटानाद करीत ओवाळावी-
श्रीमहालक्ष्मीसरस्वती धूपं समर्पयामि ।
निरांजन, घंटानाद करीत ओवाळावे-
श्रीमहालक्ष्मीसरस्वती दीपं समर्पयामि ।
देवीला पंचामृताचा नैवेद्य दाखवावा-
श्रीमहालक्ष्मीसरस्वतीभ्यां नमः । पंचाम्रुतनैवेद्यं समर्पयामि ।
ऋतं त्वा सत्येन परिषिंचामि ।
ॐ प्राणाय स्वाहा । ॐ अपानाय स्वाहा । ॐ व्यानाय स्वाहा ।
ॐ उदानाय स्वाहा । ॐ समानाय स्वाहा । ॐ ब्रह्मणे स्वाहा ।
एक एक पळी पाणी उजव्या हाताने ताम्हनात सोडावे-
उत्तरापोशनं समर्पयामि । मुखप्रक्षालनं समर्पयामि । हस्तप्रक्षालनं समर्पयामि ।
गंध फुलाने वाहावे-
करोद्वर्तनार्थे चंदनं समर्पयामि ।
विड्याच्या दोन पानांवर सुपारी व दक्षिणा ठेवावी. पळीभर पाणी तीवर सोडावे-
श्रीमहालक्ष्मीसरस्वती मुखवासार्थे पूगीफल तांबूलं समर्पयामि । दक्षिणां समर्पयामि ॥
गंधाक्षता पुष्प वाहावे-
श्रीमहालक्ष्मीसरस्वती मंत्रपुष्पं समर्पयामि ।
ताम्हनात उजव्या हाताने पळीभर पाणी सोडावे-
अनेन पूर्वपूजनेन श्रीमहालक्ष्मीसरस्वत्यौ प्रीयताम् ॥
अभिषेक - लक्ष्मीची मूर्ती असेल तर ताम्हनात ठेवून पळी पळी पाण्याने अभिषेक करावा. अभिषेक करताना श्रीसूक्त किंवा लक्ष्मी देवीची 108 नावे म्हणावीत.
श्रीमहालक्ष्मीसरस्वतीभ्यां नमः । महाभिषेकस्नानं समर्पयामि ।
शुद्धोदकस्नानं समर्पयामि ।
अभिषेकानंतर गंधाक्षता व फूल वाहावे, नंतर नमस्कार करावा-
सकलपूजार्थे गंधाक्षतपुष्पं च समर्पयामि । नमस्करोमि ।
ताम्हनातून देवीची मूर्ती काढून पुसून कलशावरील तबकात जागी ठेवावी-
वस्त्रे अर्पित करावे-
दिव्यांबरं नुतनं हि क्षौमं त्वतिमनोहरम् ।
दीयमानं मया देवि गृहाण जगदंबिके ॥
श्रीमहालक्ष्मीसरस्वतीभ्यां नमः । वस्त्रयुग्मं समर्पयामि ।
दागिने अर्पण करावे-
रक्तकंकणवैदूर्य - मुक्ताहारादिकानि च ।
सुप्रसन्नेन मनसा दत्तानि स्वीकुरुष्व त्वम् ॥
श्रीमहालक्ष्मीसरस्वतीभ्यां नमः । नानाविध - भुषणानि समर्पयामि ।
गंध लावावे-
श्रीखंडागुरुकर्पूरमृगनाभिसमन्वितम् ।
विलेपनं गृहाणाशु नमस्ते भक्तवत्सले ॥
श्रीमहालक्ष्मीसरस्वतीभ्यां नमः । विलेपनार्थे चंदनं समर्पयामि ।
हळदकुंकू वाहावे-
हरिद्रा स्वर्नवर्णाभा सर्वसौभाग्यदायिनी ।
सर्वालंकारमुख्या हि देवि त्वं प्रतिगृह्यताम् ॥
हरिद्राचूर्णसंयुक्तं कुंकुमं कामदायकम् ।
वस्त्रालंकारभूषार्थं देवि त्वं प्रतिगृह्यताम् ॥
श्रीमहालक्ष्मीसरस्वतीभ्यां नमः । हरिद्राकुंकुमं सौभाग्यद्रव्यं समर्पयामि ।
सिंदूर वहावा -
उदितारुणसंकाशं जपाकुसुमसंनिभम् ।
सीमंतभूषणार्थाय सिंदूरं प्रतिगृह्यताम् ॥
श्रीमहालक्षीसरस्वतीभ्यां नमः । सिंदूरं समर्पयामि ।
परिमलद्रव्ये अर्थात अत्तर, अबीर, अष्टगंध, देवीवर व वह्यांवर वाहावे-
ज्योत्स्नापते नमस्तुभ्यं नमस्ते विश्वरूपिणे ।
नानापरिमलद्रव्यं गृहाण परमेश्वरि ।
तैलानि च सुगंधिनि द्रव्याणि विविधानि च ।
मया दत्तानि लेपार्थं गृहाण परमेश्वरि ॥
श्रीमहालक्ष्मीसरस्वतीभ्यां नमः । नानापरिमलद्रव्याणि समर्पयामि ।
देवीला फुले वाहावी-
मंदारपारिजातादीन् पाटलीं केतकीं तथा ।
मरुवामोगरं चैव गृहाण परमेश्वरि ॥
श्रीमहालक्ष्मीसरस्वतीभ्यां नमः । पूजार्थे कालोद्भवपुष्पाणि समर्पयामि ।
उदबत्ती, घंटानाद करीत ओवाळावी-
वनस्पतिरसोद्भूतो गंधाढ्यो गंध उत्तमः ।
आघ्रेयः सर्वदेवानां धूपोऽयं प्रतिगृह्यताम् ॥
श्रीमहालक्ष्मीसरस्वतीभ्यां नमः । धूपं समर्पयामि ।
निरांजन, घंटानाद करीत ओवाळावे-
कार्पासवर्तिसंयुक्तं घृतयुक्तं मनोहरम् ।
तमोनाशकरं दीपं गृहाण परमेश्वरि ।
श्रीमहालक्ष्मीसरस्वतीभ्यां नमः । दीपं समर्पयामि ।
नैवेद्य - नैवेद्य पात्रात देवीपुढे ठेवूप पात्राखाली पाण्याने लहानसा चौकोन करून वर पात्र ठेवावे. नैवेद्यावर तुळस दलाने उदक प्रोक्षण करावे. प्राणाय स्वाहा इत्यादि प्रत्येक
स्वाहाकार म्हणताना देवीला उजव्या हाताने नैवेद्य भरवीत आहोत अशी कृती करावी. नैवेद्यावर पळीभर पाणी उजव्या हाताने फिरवावे-
श्रीमहालक्ष्मीसरस्वतीभ्यां नमः । (पदार्थाचे नाव )
नैवेद्यं समर्पयामि । ऋतं त्वा सत्येन परिषिंचामि ।
ॐ प्राणाय स्वाहा । ॐ अपानाय स्वाहा । ॐ व्यानाय स्वाहा ।
ॐ उदानाय स्वाहा । ॐ समानाय स्वाहा । ॐ ब्रह्मणे स्वाहा ।
एक एक पळी पाणी ताम्हनात सोडावे-
उत्तरापोशनं समर्पयामि । मुखप्रक्षालनं समर्पयामि । हस्तप्रक्षालनं समर्पयामि ।
पुन्हा पळीभर पाणी ताम्हनात सोडावे-
श्रीमहालक्ष्मीसरस्वतीभ्यां नमः । आचमनीयं समर्पयामि ।
गंध फुलाने वाहावे-
श्रीमहालक्ष्मीसरस्वतीभ्यां नमः । करोद्वर्तनार्थे चंदनं समर्पयामि ।
विड्याची दोन पाने त्यावर सुपारी ठेवून देवीसमोर ठेवावी व त्यावर पळीभर पाणी सोडावे-
एलालावंगकर्पूर - नागपत्रादिभिर्युतम् ।
पूगीफलेन संयुक्तं तांबूलं प्रतिगृह्यताम् ॥
श्रीमहालक्ष्मीसरस्वतीभ्यां नमः । मुखवासार्थे पूगीफल तांबूलं समर्पयामि
देवीसमोर पान- सुपारीवर दक्षिणाद्रव्य ठेवून त्यावर तुळस दल, फूल ठेवून उजव्या हाताने पळीभर पाणी सोडावे-
हिरण्यगर्भगर्भस्थं हेमबीजं विभावसोः ।
अनन्तपुण्यफलदमतः शांति प्रयच्छ मे ॥
श्रीमहालक्ष्मीसरस्वतीभ्यां नमः । सुवर्णपुष्पदक्षिणां समर्पयामि ॥
देवीला यथाशक्य पक्व फळे अर्पण करावीत-
फलेन फलितं सर्व त्रैलोक्यं सचराचरम् ।
तस्मात्फलप्रदानेन सफलाः स्युर्मनोरथाः ॥
श्रीमहालक्ष्मीसरस्वतीभ्यां नमः । ऋतुलब्धानि फलानि समर्पयामि ।
कापूर आरती ओवाळावी-
ह्रत्स्थाज्ञानतमोनाशक्षमं भक्त्या समर्पितम् ।
कर्पूरदीपममलं गृहाणं परमेश्वरि ।
देवीची आरती करावी. नंतर मंत्रपुष्पांजली वाहावी
मंत्रपुष्पांजलि - 'ॐ यज्ञेन यज्ञमयजन्त० पासून सभासद इति ।" पर्यंतचे मंत्र सर्वांनी यथाशक्य सुस्वर म्हणावेत व हातातील फुल एकेकाने देवीवर वाहावीत. त्यावेळी
लक्ष्मीगायत्री मंत्र म्हणावा.
लक्ष्मीगायत्री - ॐ महालक्ष्मी च विद्महे, विष्णुपत्नी च धीमहि । तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् ।
श्रीमहालक्ष्मीसरस्वतीभ्यां नमः । मंत्रपुष्पं समर्पयामि ।
प्रदक्षिणा-नमस्कार-प्रार्थना करण्यासाठी स्वतःभोवती एक प्रदक्षिणा घालावी व देवीला साष्टांग नमस्कार करावा-
यानि कानि च पापानि ब्रह्महत्यासमानि च ।
तानि तानि विनश्यंति प्रदक्षिणपदे पदे ॥
श्रीमहालक्ष्मीसरस्वतीभ्यां नमः । प्रदक्षिणां समर्पयामि । नमस्करोमि ।
गंधाक्षता व फूल वाहावे व देवीला नमस्कार करावा-
श्रीमहालक्ष्मीसरस्वतीभ्यां नमः । छत्रं चामरं गीतं नृत्यं वाद्यमान्दोलनमित्यादि सर्वराजोपचारार्थे गंधपुष्पाक्षतान् समर्पयामि ।
अनेन कृतपूजनेन श्रीमहालक्ष्मीसरस्वत्यौ प्रीयताम् ।
अॅपमध्ये पहा x