धनत्रयोदशीला दारासमोर ठेवा या 6 वस्तू

दिवाळीत मुख्य प्रवेश दाराची स्वच्छता आणि सजावटीवर विशेष लक्ष दिलं जातं. वास्तूप्रमाणे, घर आणि दुकानाच्या मेन गेटसमोर या वस्तू ठेवल्याने लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरात धन आणि सुख-समृद्धी घेऊन येते. 
* मुख्य प्रवेश दाराजवळ सजावटी बाऊलमध्ये पाणी भरून त्यात फूल टाका. पाणी आणि फुलाने सजवलेला हा पॉट दाराच्या पूर्व किंवा उत्तर दिशेत ठेवावे.
 
* मुख्या दारावर देवी लक्ष्मीचे पाउलं काढणे शुभ असतं. पाऊल आतल्या बाजूला प्रवेश करत आहेत असे सेट करावे.
 
* दारावर तोरण बांधायला हवं. तोरण फुलाचे, आंब्याच्या किंवा अशोकाच्या पानांचे असावे.

* दारावर देवी लक्ष्मीचा असा फोटो लावावा ज्यात देवी आई कमळाच्या फुलावर विराजित असेल.
 
* दारावर स्वस्तिक मांडायला हवं. बाजारात डिजाइनर स्वस्तिक स्टिकर्स मिळतात किंवा आपण कुंकाने स्वस्तिक मांडू शकता.
 
* शुभ- लाभ आणि ॐ लिहिलेले स्टिकर किंवा रांगोळीने लिहिणेही फलदायी ठरेल. हे चिन्ह दाराच्या पूर्व किंवा उत्तर दिशेकडे मांडायला हवे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती