जरा कठीणच. सर्व सणांमध्ये या बदललेल्या सणांच्या स्वरूपामध्येही आनंदाने सहभागी होणार्या या तरुणाईवर नेहमीच टीका होते. ‘ही मुलं आपल्या परंपरा जपत नाहीत’ किंवा ‘आमच्यावेळी असं नव्हतं हं’ अशी वाक्यं ऐकायला मिळतात. पण खरंच या सणांमध्ये एवढा बदल झालाय? आणि जर तसं असेल तर ते आपल्या प्रगत होत जाणार्या संस्कृतीसाठी योग्य की अयोग्य?