सर्व प्रथम, अमृत भांडे धारण केलेले भगवान धन्वंतरीचे चित्र एका चौरंगावर स्थापित करा आणि नंतर धूप, दीप, फुले, नैवेद्य आणि आरतीने त्या चित्राची पूजा करा. अशा प्रकारे धनत्रयोदशीच्या दिवशी भगवान धन्वंतरीची पूजा केल्याने आरोग्य आणि लक्ष्मी प्राप्त होते.
धनत्रयोदशीच्या दिवशी दुपारी करा हे काम -
भगवान धन्वंतरीची पूजा केल्यानंतर दुपारी नवीन वस्तू खरेदी करा. नवीन वस्तू खरेदी करताना लक्षात ठेवा की खरेदीमध्ये चांदीची एखादी वस्तू असली पाहिजे. धनत्रयोदशीला चांदीची खरेदी केल्याने वर्षभर सुख-समृद्धी मिळते.
धनत्रयोदशीच्या दिवशी संध्याकाळी/प्रदोष काळात या गोष्टी करा-
धनत्रयोदशीच्या दिवशी संध्याकाळी भगवान यमराजासाठी दिवा दान करा, याला 'यम-दीपदान' म्हणतात.