श्रीदत्त उपनिषद - अध्याय पांचवा

सोऽहम्‍ गायत्री पुण्य । सोऽहम्‍ अजपा पूर्ण । सोऽहम्‍ ध्यानी मन उन्मन । उन्मनी जाण ते मुद्रा ॥१॥
सोऽहम्‍ हंसा ब्रह्म । ऐसे करी जो गायन । परमहंस पदवी पावोन । जीवन्मुक्त होत असे ॥२॥
कल्पनेचा करावा अंत । कल्पना न करावी चित्तात । होता आपण कल्पनातीत । ब्रह्मज्ञान होत असे ॥३॥
अंतरी नोहे विचार । नर नव्हे तो शंकर । तयापासी सिद्धी सर्व । तिष्टत राहाती सर्वदा ॥४॥
विचार येत वा जात । त्याजकडे राहावे पाहात । ऐसे करिता शांत । मन आपैसे होत असे ॥५॥
नुरता कल्पना जाण । निर्विकल्प होई मन । आत्मज्ञान ब्रह्मज्ञान । आपैसे जाण होतसे ॥६॥
ऐसे श्रीदत्त उपनिषद । श्रीदत्त सांगती दत्तावधूतास । यावरी ठेविता विश्वास । ब्रह्मज्ञान होतसे ॥७॥
ॐ निरंजनाय विदमहे । अवधूताय धिमही । तन्नो दत्त प्रचोदयात ॥८॥
दत्तात्रेयो हरि कृष्णो । मुकुंदो आनंददायका । मुनी दिगंबरो बालो । सर्वज्ञो ज्ञानसागरा ॥९॥
दिगंबर मुने बाला । समर्था विश्वस्वामीने । परमहंसा महाशून्या । महेश्वासा महानिधे ॥१०॥
ॐ हंस हंसाय विदमहे । परमहंसाय धिमही । तन्नो दत्त प्रचोदयात ॥११॥
ॐ शून्य शून्याय विदमहे । परमशून्याय धिमही । तन्नो परब्रह्म प्रचोदयात ॥१२॥
ॐ दत्तात्रेयाय विदमहे । योगीश्वराय धिमही । तन्नो दत्त प्रचोदयात ॥१३॥
ॐ स्वामी समर्थाय विदमहे । परम अवधूताय धिमही । तन्नो महादत्त प्रचोदयात ॥१४॥
सर्व देवी देवता स्वरुपाय । महादत्त अवधूताय । प्रज्ञापूर निवासाय । नमन माझे तुजलागी ॥१५॥
हे दत्तात्रेया गुरुवर्या । मजवरती करी तू दया । सदभक्तासी सदया । अन्नवस्त्राते देई तू ॥१६॥
तैसेचि देई सदगुण । देई सदगुरु दर्शन । करुणामय ज्यांचे जीवन । लोकोद्धारार्थ अवतरले १७॥
॥ इति श्रीदत्त उपनिषद ॥

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती