हृत्तमः प्रकाशक । शिव दे अमृत विशोक । उलंडलें तेची ऐक । ती हे नदी अमरजा ॥२॥
ही भयोपताप वारी । भीमेशीं संगम करी । प्रयागापरी पाप वारी । भूमीवरी हे तारक ॥३॥
तयावरी पापविनाश । तीर्थ दाविती यतीश । तो भेटे त्या समयास । पूर्वाश्रमस्वसा रत्ना ॥६॥
ती त्या महातीर्थी न्हाली । कुष्ठ जाउनी शुद्ध झाली । गुर्वाज्ञेनें तेथें राहिली । मुक्त झाली त्याच जन्मी ।
वारी संकट कोटीतीर्थ । पुढें दाविती रुदतीर्थ । गयेसम फल तेथ । चक्रतीर्थ केशवापुढें ॥८॥
हें समूळ वारी दुरित । अस्थी करी चक्रांकित । द्वारकेहुनी हें प्रशस्त । हो पतित स्नानें ज्ञानी ॥९॥